Ajit Pawar l आगामी विधासभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात जागा वाटपाचा मुद्दा चांगलंच चर्चेत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर एक मोठं भाष्य केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.
लवकरच जागावाटप जाहीर करू :
राज्यातील विधानसभेत महायुतीच सरकार आणणं हे आमचं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यामुळे महायुतीची सगळे घटक पक्ष एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत. याशिवाय महायुतीच जागावाटपाच देखील बरंच काम पूर्ण झालेलं आहे.
याशिवाय राज्यातील जागावाटपावरून काही ठिकाणी मार्ग मात्र अद्याप निघाला नाही. परंतु आम्ही यावर लवकरच बसून मार्ग काढू. त्यामुळे जागावाटप झालं की आम्ही जाहीर करूअसं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीत तब्बल 80 ते 90 जागा लढण्यावर दावा केला असल्याची चर्चा देखील रंगली आहे.
Ajit Pawar l मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले? :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील दगडूशेठ गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील जनतेला सुखी ठेव अशी प्रार्थना केली. तसेच अजितदादांनी गणपतीची पूजा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.
राज्यातील सगळ्याच पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद मिळावं असं वाटतं असत. मात्र त्या सगळ्यांमध्ये मी देखील आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा हा गाठावा लागतो. त्यामुळे सर्वांचीच इच्छा पूर्ण होत नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
News Title : Ajit Pawar Big Statement On CM Position
दिल्लीचा कारभार पाहणार ‘या’ महिला मुख्यमंत्री!
सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!
PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव
..तर बंद होऊ शकते SSY खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल






