‘या’ अभिनेत्रीसाठी स्वतःच्या मुलाने अजय देवगणच्या कानाखाली काढला जाळ!

On: August 28, 2024 2:56 PM
Ajay Devgn
---Advertisement---

Ajay Devgn l बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने मोठं मोठ्या चित्रपटांमध्ये काम करून फिल्म इंडस्ट्री प्रचंड गाजवली आहे. अजय देवगणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अजयच्या या चित्रपटांना देखील प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. अशातच अजय हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग विदेशात करत असल्याची माहिती मिळाली आहे.

अजय देवगणने मुलाखतीत केला मजेशीर किस्सा शेअर :

अजय देवगणला बॉलिवूडमध्ये तब्बल 33 वर्ष पूर्ण होत आहेत. अजय देवगणने ज्या चित्रपटातून डेब्यू केला, तोच चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला आहे. त्यानंतर अजय देवगणने तेंव्हापासून आयुष्यात कधीही मागे वळून बघितले नाही. अशातच आता अजय देवगणने एका मुलाखतीत मजेशीर किस्सा शेअर केला आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणचा 2017 मध्ये रिलीज झालेला ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, अर्शद वारसी, तब्बू आणि परिणीती चोप्रा यांनी देखील धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यावेळी या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले होते. विशेष म्हणजे अजय देवगण याचे देखील या चित्रपटासाठी प्रचंड काैतुक करण्यात आले होते.

Ajay Devgn l अजय देवगणच्या मुलाने ‘या’ अभिनेत्रीमुळे केलं धक्कादायक कृत्य :

अशातच काही दिवसांरपूर्वी अजय देवगणने एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला आहे. यावेळी अजयने सांगितले की, ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट आम्ही सर्वजण कुटुंबासोबत घरी पाहत होतो. यावेळी चित्रपटामध्ये परिणीती चोप्राच्या कॅरेक्टरचे निधन झाले होते. यावेळी माझा मुलगा युग हा खूपच दु:खी झाला आणि जोराने रडू लागला. त्यावेळी युगला रडताना पाहून आम्ही सर्वजण हसत होतो.

त्यावेळी मी युगला विचारले की, काय झालं? तर त्यानंतर युगने माझ्या थेट कानाखाली मारत म्हणाला की, तुम्ही माझ्यासोबत बोलू नका. त्यावेळी एवढं सगळं होऊन देखील काजोल आणि निसा या हसणं बंद करत नव्हत्या. अजयने हा किस्सा मुलाखतीत शेअर केल्याने प्रेक्षकांना तो प्रचंड भावला आहे.

News Title – actor Ajay Devgn has made a big revelation about his son

महत्त्वाच्या बातम्या-

फडवणीस शिवरायांचे दुश्मन…; मनोज जरांगे नेमके काय म्हणाले

“आमच्या नेत्याच्या केसाला जरी धक्का..”; सिंधुदुर्गातील राड्यावर सुप्रिया सुळे संतापल्या

…तर यांना घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन; नारायण राणेंची माविआला धमकी

‘तारक मेहता..’ मधील भिडे मास्टरने केली निर्मात्यांची पोलखोल?, मालिकाही सोडणार?

अजित पवारांना मोठा झटका, बारामती शेजारचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now