Aishwarya Rai | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहेत. पाहायला गेलं तर बच्चन कुटुंबातील कुणीही याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलं नाहीये. स्वतः ऐश्वर्या (Aishwarya Rai ) आणि अभिषेकने सुद्धा यावर काहीच भाष्य केलं नाहीये.
मात्र, ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये बच्चन कुटुंबापासून विभक्त दिसून आली आहे. बीग-बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, लेक श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कुठेही सोबत स्पॉट होतात. तर, ऐश्वर्या मात्र नेहमीच लेक आराध्यासोबत (Aishwarya Rai ) हजेरी लावत असते. ऐश्वर्या ही अभिषेक किंवा बच्चन कुटुंबासोबत एकत्रितपणे दिसत नाही. अशात तिचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्याचा नवा व्हिडिओ व्हायरल
ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत दुबईला गेली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये तिने वेडिंग रिंग घातली नसल्याचं देखील समोर येतंय. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
व्हायरल होणारा व्हिडिओ हा दुबईचा आहे. येथे ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत SIIMA अवॉर्ड्समध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये ऐश्वर्याचे आयोजक स्वागत करताना दिसत आहेत. एका चाहत्याने ऐश्वर्यासाठी (Aishwarya Rai ) फुलांचा गुच्छ आणला आहे. ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे पण तिने वेडिंग रिंग घातली नसल्याचं त्यात दिसून येतंय. हाच मुद्दा आता नेटकऱ्यांनी उचलून घेतला आहे.
View this post on Instagram
अभिषेक बच्चननेही काढली वेडिंग रिंग?
इतकंच नाही तर, अनेकवेळा अभिषेक जेव्हा स्पॉट झाला, तेव्हा त्याच्या हातात देखील वेडिंग रिंग दिसून आली नाही. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक हे खरंच वेगळे झाले काय?, अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू वर्षे लागल्या आहेत. ऐश्वर्या (Aishwarya Rai ) आणि अभिषेक यांच्या लग्नाला आता जवळपास 17 वर्षे झाली आहेत. मात्र, सध्या दोघांच्याही घटस्फोटाच्याच अधिक चर्चा रंगत असतात.
News Title – Aishwarya Rai video from Dubai goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबराव डख यांचा पावसाबद्दल महत्वाचा अंदाज, शेतकऱ्यांनाही दिला सल्ला
धनगर आरक्षणाबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
महादेव आज ‘या’ राशींवर प्रसन्न होणार, वाचा सोमवारचे राशीभविष्य
राज्यात आज कुठं कुठं पाऊस पडणार?, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज






