ऐश्वर्या राय अन् अभिषेक बच्चनच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा!

On: December 1, 2025 12:28 PM
Aishwarya Rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हे नाव सदैव चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपासून ते खासगी आयुष्यापर्यंत प्रत्येक हालचालीवर चाहत्यांचे बारकाईने लक्ष असते. अभिषेक बच्चनसोबत तिचे लग्न होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्यांच्या नात्याबद्दल मात्र निरनिराळ्या चर्चा सतत रंगत असतात. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात वादळ असल्याच्या अफवा जोर धरत होत्या. मात्र, ऐश्वर्या किंवा अभिषेक (Abhishek Bachchan) यांनी या चर्चांवर कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या प्रेमकथेतील प्रपोजचा किस्सा बऱ्याचदा चर्चेत राहिला आहे. दोघेही परदेशात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले आणि अभिषेकने तिला लग्नासाठी विचारले. या निर्णयानंतर 2007 मध्ये दोघांचे मुंबईत थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. तो त्या काळातील सर्वात चर्चेतला सेलिब्रिटी विवाह मानला गेला. पण, या लग्नाआधी ऐश्वर्याने केलेली एक खास भेट आता पुन्हा चर्चेत आली आहे.

लग्नाचा निर्णय घेण्याआधी ऐश्वर्याची ‘ती’ भेट :

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी उत्सवाला हजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. ऐश्वर्याने आपल्या भाषणात श्री सत्य साई बाबा यांच्या मार्गदर्शनाचा तिच्या आयुष्यावर किती खोल परिणाम झाला आहे, हे सांगितले. तिच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनीच सांगितल्याचे ती नेहमी सांगत आली आहे.

याच पार्श्वभूमीवर एक मोठा खुलासा समोर आला आहे. अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) तिला लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर ऐश्वर्याने थेट श्री सत्य साई बाबा यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. अभिषेकसोबत विवाह करावा का, हा निर्णय घेण्यापूर्वी तिने त्यांच्याशी चर्चा केली होती. श्री सत्य साई बाबा यांनी हा निर्णय योग्य असल्याचा सल्ला दिल्यानंतरच ऐश्वर्याने अभिषेकला होकार दिला, अशी माहिती समोर आली आहे.

Aishwarya Rai | श्रद्धा आणि निर्णय—ऐश्वर्याच्या निजी आयुष्याचा आधार :

ऐश्वर्या राय ही श्री सत्य साई बाबा यांच्या कार्याच्या आणि शिकवणीच्या मार्गदर्शनाखाली वावरणारी कलाकार मानली जाते. त्यांच्या कार्यक्रमांना ती सातत्याने उपस्थित राहिलेली दिसते. लग्नासारखा मोठा निर्णय घेताना देखील तिने त्यांचा सल्ला घेणे, हे तिच्या श्रद्धेचे प्रतिबिंब मानले जात आहे.

अभिषेकसोबत विवाह करण्यापूर्वी ऐश्वर्या सलमान खानला डेट करत होती, हे सर्वज्ञात आहे. दोघांचे नातं वाईट वळणावर संपुष्टात आल्यावर काही काळातच ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आजही ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांचा संसार हा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतल्या जोडप्यांपैकी एक आहे. मात्र, या जोडप्याबद्दल उठणाऱ्या अफवांवर ते दोघेही शांतच राहतात. त्यातच ऐश्वर्याने लग्नापूर्वी केलेल्या या भेटीचा खुलासा पुन्हा समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

News Title: Aishwarya Rai Took Sai Baba’s Guidance Before Marrying Abhishek Bachchan – A Big Revelation Surfaces

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now