Aishwarya Rai | ‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय कोणत्याच गोष्टीत मागे नाहीये. आता नुकतीच ती भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत अव्वल आली आहे. ऐश्वर्या कायम तिच्या प्रोफेश्नल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत आली आहे. अभिषेक अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, अभिषेकसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी ऐश्वर्याने झाडासोबत लग्न केल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाली ऐश्वर्या?
2007 मध्ये ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांनी सर्वांच्या सहमतीने लग्न केलं. मात्र, त्तपूर्वी ऐश्वर्याने झाडासोबत सात फेऱ्या मारुन लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. या मागचं कारण म्हणजे, मंगळ दूर करण्यासाठी ऐश्वर्याला झाडासोबत फेऱ्या माराव्या लागल्या. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना ऐश्वर्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
View this post on Instagram
गरज वाटली नाही-
मुलाखतीमध्ये बोलत असताना ऐश्वर्या (Aishwarya Rai) म्हणाली की, मला ही अफवा निरुपयोगी वाटली, शिवाय याबद्दल उत्तर देण देखील मला गरजेचं वाटत नाहीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन खरोखरंच घटस्फोट घेणार का?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच काही भाष्य करण्यास तयार नाहीये.
News Title : Aishwarya rai talks about wedding
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवुडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; राज कपूर-देवानंद यांच्यासोबत केलंय काम
एसबीआय बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; लगेचच करा अर्ज
“गौतम अदानींना जमीन देण्यास विरोध केल्यानेच…”; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज
“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”






