Aishwarya Rai कडून सर्वात मोठा खुलासा, म्हणाली, “या कारणामुळे आमच्या दोघात मतभेद”

On: December 30, 2023 1:45 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या आपल्या प्रर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. गेले काही दिवस ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या शिवाय ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबदल दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे सासू जया बच्चन आणि नंनद श्वेता बच्चन यांनी देखील ऐश्वर्याच्या वागणुकीबदल काही खुलासे केले आहेत. मात्र आता ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्याबदल एक नवी माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

एका मुलाखतीत बोलत असताना ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) तिच्या आणि अभिषेकच्या नात्याबदल नवा खुलासा केला आहे. ऐश्वर्याने दिलेली ही मुलाखत तूफान व्हायरल झाली होेती. या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या म्हणाली की, माझ आणि अभिषेकचं दररोज भांडण होतं.

ऐश्वर्या रायचं हे बोलणं ऐकून सर्वजण हैराण झाल्याचं पाहयला मिळालं होतं. हे बोलत असताना या वेळी अभिषेक देखील तिथे हजर होता. ऐश्वर्याने केलेल्या या खुलासावर अभिषेकने थेट स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाला अभिषेक बच्चन?

अभिषेक बच्चन म्हणाला की, भांडणे म्हणजे भांडणे नसतात. काही गोष्टींवरून आमच्यामध्ये मतभेद होतात. पुढे तो म्हणाला की, आमच्या भांडणाचे रोज वेगवेगळे कारणं असतात. मात्र त्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. पुढे अभिषेक बच्चन म्हणाला की, विषय कोणताही असो आणि वादाचं कारण काहीही असो आणि चूक कोणाचीही असो शेवटी माफी ही मलाच मागावी लागते.

2007 मध्ये करत होते डेट-

2007 मध्ये ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांचा विवाहसोहळा हा पार पडला. लग्नाच्या अगोदर यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं.

अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या काही वर्षे अगोदर ऐश्वर्या राय ही सलमान खान याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. चाहत्यांना ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी प्रचंड आवडते.

News Title : aishwarya rai talks about the fights in her relation

महत्त्वाच्या बातम्या-

Pune Bus Accident | पुण्याजवळच्या ताम्हिणी घाटात बस उलटली, महत्त्वाची अपडेट हाती!

तुमच्या फोनमध्ये ‘हे’ Android Apps असतील तर आत्ताच हटवा!, गुगलने केली मोठी कारवाई

Weather Update | ऐन थर्टी फर्स्टला ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

Facebook, Instagram वापरताना काळजी घ्या, नाहीतर होणार अकाऊंट डिलीट; सरकारकडून नवे नियम लागू

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now