ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर; अभिषेकच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांनाच धक्का

On: July 18, 2024 12:16 PM
Abhishek Aishwarya Divorce
---Advertisement---

Aishwarya Rai-Abhishek Bachchan | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. दोघेही काही न काही कारणांनी सतत चर्चेत असतात. ऐश्वर्या अनेक कार्यक्रमांमध्ये बच्चन कुटुंबापासून विभक्त दिसून आली आहे. बीग-बी अमिताभ बच्चन, जया बच्चन, लेक श्वेता आणि अभिषेक बच्चन हे कुठेही सोबत स्पॉट होतात. तर, ऐश्वर्या मात्र नेहमीच लेक आराध्यासोबत (Aishwarya Rai-Abhishek Bachchan ) हजेरी लावत असते.

नुकताच अनंत अंबानी आणि राधिका यांचा मुंबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात देखील ऐश्वर्या लेक आराध्या सोबत दिसून आली. तर, बच्चन कुटुंब वेगळं दिसून आलं. त्यामुळे ऐश्वर्याचे कुटुंबासोबत बनत नसल्याचे म्हटले गेले. अशात अभिषेक बच्चनच्या एका कृतीमुळे या चर्चेला अजूनच जोर आला आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण

अभिषेक बच्चनच्या सोशल मीडियावरील एका अॅक्टिव्हीटीने त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिषेक बच्चनने घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. तो नेहमीच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो.अशातच घटस्फोटाशी संबंधित एक पोस्टला अभिषेकने लाईक केलं आहे.

बरीच वर्ष संसार केल्यानंतर अचानक घटस्फोट(Aishwarya Rai-Abhishek Bachchan )  होणे यावर ही पोस्ट होती.  इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. याच पोस्टला अभिषेकने लाईक केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

‘ती’ पोस्ट नेमकी काय?

“घटस्फोट घेणे कोणासाठीही सोपे नाही. रस्ता ओलांडताना हात पकडलेल्या वृद्ध जोडप्यांचे हृदयस्पर्शी व्हिडीओ पुन्हा बनवण्याची किंवा आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही? तरीही, कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. परंतु, अनेक दशके एकत्र राहिल्यानंतर, लहान-मोठ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहून त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण, टप्पा एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा ते कसे सामोरे जातात? असे काय आहे जे त्यांना ब्रेकअप करण्यास प्रवृत्त करते आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?”, अशा आशयाची (Aishwarya Rai-Abhishek Bachchan ) ही पोस्ट होती.

जेव्हा विवाहित जोडपे वयाच्या 50 व्या वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतात, त्याला ‘ग्रे घटस्फोट’ किंवा ‘सिल्व्हर स्प्लिटर्स’असं म्हणतात. याच संदर्भात ही पोस्ट होती. याच पोस्टला अभिषेकने लाईक केलं आहे.त्याचा स्क्रीनशॉटही ‘रेडिट’वर व्हायरल होत आहे.यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

News Title –  Aishwarya Rai-Abhishek Bachchan divorce rumors again

महत्त्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता!

भाजप नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राजकारण पेटलं

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे?, हवामान विभागाचा मोठा इशारा

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका अधिक, पालकांनो आपल्या मुलांचं ‘असं’ करा संरक्षण!

शिंदे, फडणवीस, ठाकरे नव्हे तर राज्यातील मतदारांना भाजपचा ‘हा’ नेता मुख्यमंत्री पाहायचाय!

Join WhatsApp Group

Join Now