श्रद्धा वालकर प्रकरण | अफताब पूनावालाच्या वक्तव्याने खळबळ

On: November 29, 2022 6:26 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | देशाला(Country) हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीतून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच दिल्ली पोलिस करत असलेल्या चौकशीत अफताब पूनावालाने खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

नुकतीच अफताबची पॉलिग्राफी चाचणी(Polygraphy test) करण्यात आली. यात त्याने अनेक धक्कादायक वक्तव्ये केली असल्याचं कळतंय. त्यानं केलेली वक्तव्य आश्चर्यचकित करणारी आहेत.

आफताब याने चाचणी दरम्यान केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. यातून त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप नसल्याचं दिसून आलं. “श्रद्धा प्रकरणात मला फाशी झाली तरी चालेल, स्वर्गात मला अप्सरा भेटतील”, असं वक्तव्य आफताबने केलं आहे. ज्यामुळे सध्या खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.

आफताबने अनेक हिंदू मुलींना डेट केलं आहे. तो जेव्हा श्रद्धासोबत नात्यात होता तेव्हादेखील तो मुलींना डेट करायचा. 20 पेक्षाजास्त मुली त्यांच्या संपर्कात असून आफताबचे त्यांच्यासोबत संबंध होते. या सगळ्या मुली हिंदू असल्याचं निष्पन्न झालं आहे.

बंबल या डेटिंगअॅपवरुन तो मुलींना शोधायचा त्यांच्याशी संपर्क साधायचा. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा त्याने श्रद्धाची हत्या केली,त्यानंतर तो एका मुलीला घरी घेऊन आला होता. ती तरुणी एक मानोसपचार तज्ञ्ज (Psychiatrists) होती. इतकंच नव्हे तर त्याने तिला श्रद्धाची अंगठीदेखील गिफ्ट केली होती.

दरम्यान, श्रद्धा वालकर या तरुणीसोबत लिव्ह-ईन (Live-in) मध्ये राहणाऱ्या आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now