“…तरच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरील मोक्का टिकेल”, वकील नेमकं काय म्हणाले?

On: January 11, 2025 4:07 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Case l बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. याप्रकरणी आज सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे आणि जयराम चाटे या 7 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र आता याप्रकरणी ज्येष्ठ वकील माजिद मेमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वकील माजिद मेमन नेमकं काय म्हणाले? :

ज्येष्ठ वकिल माजिद मेमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्का हा एक असा कायदा आहे, जो कोणत्या परिस्थितीत गुन्हा केला आहे, तसेच त्या गुन्ह्याप्रकरणी कोणत्या प्रकराचा पुरावा आहे हे पाहून मोक्का लावला तर तो टिकेल, अन्यथा जर तुम्ही फक्त दडपणाखाली मोक्का लावला तर तो मात्र टिकणार नाही, असे वकील माजिद मेमन यांनी म्हटले आहे.

पुढे वकील माजिद मेमन म्हणाले की, “कधीही जेव्हा एखादी हत्या होते, तसेच खंडणीचे काही प्रकरण असेल किंवा याव्यतिरिक्त इतर गंभीर स्वरुपातील कोणताही गुन्हा असेल तर प्रत्येकाला एकच कायदा लागू होतो. तसेच मोक्का लागणं म्हणजे हा एक फार गंभीर स्वरुपाचा कायदा असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

Santosh Deshmukh Case l वाल्मिक कराडवर मोक्का नाही :

दरम्यान, या घटनेतील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. मात्र इतर सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र आता मोक्का कायद्यांतर्गत हा खटला चालवला जाणार आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. “माझ्या वडिलांची हत्या होऊन आता महिना उलटला आहे. या प्रकरणात पोलीस त्यांचा तपास करत आहेत, परंतु त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती दिली जात नाही. या प्रकरणात तपास कुठवर आलाय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळायला हवं”, अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे.

News Title :  Advocate majid memon talk about all accused Mocca case

महत्त्वाच्या बातम्या-

केस कापायला आता मोजावे लागणार इतके पैसे, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका!

बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

बीडमध्ये एका महिन्यात घडल्या मोठ्या घडामोडी? जाणून घ्या संपूर्ण घटना एका क्लिकवर

प्रसिद्ध अभिनेत्याला आला हार्टअटॅक, बातमीने सिनेसृष्टीत उडाली खळबळ

वाल्मिक कराडवर MCOCA का लागला नाही?, मोठं कारण समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now