एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी

On: December 14, 2024 4:44 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Eknath Shinde l विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मुंबई येथील रस्ता घोटाळ्याची एसआयटी चौकशी लावा अशी मागणी मुंबई भाजपाकडून सध्या होत आहे. मात्र या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? :

मुंबई भाजपकडून मुंबईमधील रस्ता घोटाळाप्रकरणात SIT चौकशी लावण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र याप्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील रस्त्याच्या घोटाळ्याची चौकशी करा हेच मी पण बोलत होतो. तसेच जी मी मागणी करत होतो, तीच मागणी आता भाजप पक्ष सुद्धा करत आहे.

कारण खोके सरकारच्या देखरेखीत मुंबईमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. मात्र आता राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता त्यांना स्वच्छ सरकार चालवण्याची खरोखर मोठी संधी मिळाली आहे, त्यामुळे आता भाजपला जर स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर त्यांनी चौकशी पूर्ण होईलपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Eknath Shinde l …तरच आम्ही समजू हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही :

दरम्यान, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही की एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा त्यांचा हात नाही आणि ठेकेदाराचा देखील फायदा झाला नाही. तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळापासून त्यांना बाजुला ठेवावे. तसेच फडणवीस सरकारने हे केले तरच आम्ही समजू की हे सरकार वाशिंग मशिन सरकार नाही.

News Title – Aditya Thackeray strongly criticizes BJP over the Mumbai road scam 

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई

उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती

सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

अटकेनंतर अल्लू अर्जुनने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

एकनाथ शिंदेंच्या दोन बड्या नेत्यांना झटका! मंत्रिपदातून पत्ता कट होणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now