WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर घालणार धुमाकूळ!

On: January 14, 2024 5:39 PM
WhatsApp
---Advertisement---

मुंबई | मॅसेज, टेक्सटिंग यांसारख्या गोष्टीसाठी आपण इंस्टट मॅसेजिंग अ‌ॅप वापरतो. अनेकांना व्हाटसअ‌ॅप (WhatsApp) हे वापरण्यासाठी अगदी सोपं वाटतं. जेव्हाही इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशनची चर्चा होते तेव्हा सर्वात आधी व्हॉट्सअॅपचे नाव घेतलं जातं.

WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर

जगभरातील 2 अब्जाहून अधिक लोक WhatsApp वापरतात आणि म्हणूनच कंपनी आपल्या वापरकर्त्यांना नवनवीन वैशिष्ट्ये पुरवत असते. याच व्हाट्सअ‌ॅपनं नवीन फिचर्स सध्या आणलं आहे.

WhatsApp वापरकर्त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनीने आता आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडलं आहे. ज्यानंतर या मेसेजिंग ऍप्लिकेशनमध्ये एक नवीन अनुभव उपलब्ध होणार आहे.

अनेक वेळा असं घडतं की व्हॉट्सअॅप नवीन फीचर आणतं पण अनेक यूजर्सना त्याची माहिती नसते. अशा परिस्थितीत वापरकर्ते अनेक दिवस जुन्या फीचर्ससह प्लॅटफॉर्म वापरत राहतात. कंपनीने एक फीचर सादर केलं आहे ज्याद्वारे यूजर्सला प्रत्येक नवीन फीचरची माहिती त्वरित मिळेल.

आतापर्यंत लोकांना व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेट्स आणि नवीन फीचर्सची माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जावं लागत होतं पण आता असं होणार नाही. आता व्हॉट्सअॅपने सेटिंग्जमध्ये एक नवीन अपडेट बटण दिलं आहे ज्यामध्ये अपडेट नोटिफिकेशन आणि ऑटो अपडेट पर्याय उपलब्ध असतील. आता व्हॉट्सअॅपचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाण्याची गरज नाही.

व्हॉट्सअॅपच्या या आगामी फीचरची माहिती WABetainfo या लोकप्रिय वेबसाइटने दिली आहे. रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर काही निवडक यूजर्सना देण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

iPhone 15 तब्बल 12 हजार रुपयांनी स्वस्त, आता फक्त एवढे रुपये भरा आणि घरी आणा!

Shaun Marsh | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर; दिग्गज खेळाडूने घेतली निवृत्ती

कार घेणार असाल तर ही बातमी वाचा; Hyundai ने दिली मोठी गुड न्यूज

Shruti Marathe | ‘तू माझ्यासोबत झोपली तर…’; श्रुती मराठेचा अत्यंत धक्कादायक खुलासा

Bigg Boss 17 | सुशांतबद्दल बोलू नकोस, कारण तुझ्या सासरचे… अंकिताला आईचा मोठा सल्ला

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now