अदानींना लागणार जवळपास 60 हजार कोटींची लॅाटरी

On: September 6, 2024 1:58 PM
Adani Group
---Advertisement---

Adani Group | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाच्या मेगा प्रोजेक्टला महाराष्ट्र सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीने गुरुवारी एकूण 1.17 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या चार मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली. यामध्ये इस्रायलची टॉवर सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूह (Adani Group) यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचा समावेश आहे.

पनवेल येथे बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पात एकूण 84,947 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. या प्रकल्पातून 5,000 पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारनंतर हा प्रोजेक्ट केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी जाईल. केंद्राने मंजुरी दिली तर अदानींना (Adani Group) मोठी लॅाटरी लागणार आहे.

Adani Group | अदानींना मोठी लॅाटरी

केंद्राकडून मंजुरी मिळाली तर सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी केंद्र सरकार जवळपास 50% आणि राज्य सरकारे जवळपास 25% सबसिडी देते. म्हणजेच अदानींना 84,000 कोटीच्या प्रकल्पात जवळपास 60,000 कोटींची एकुण सबसिडी मिळू शकते.

सेमीकंडक्टर प्रकल्पाव्यतिरिक्त, उपसमितीने पुण्यात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीने 12,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह नवीन ईव्ही उत्पादन सुविधा आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने छत्रपती संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली.

21,273 कोटींच्या गुंतवणुकीसह योजनेला मंजुरी दिली. दोन प्लांट्समधून अनुक्रमे 1,000 आणि 12,000 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर

पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?

रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now