गाडी अडवली म्हणून अभिनेत्रीने होमगार्डचे कपडे फाडले, फोन हिसकावला; गुन्हा दाखल

On: February 28, 2024 8:27 AM
Actress
---Advertisement---

Actress | तेलगू अभिनेत्री सौम्या जानूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक होमगार्डला तिने मारहाण केल्याचा आरोप आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अभिनेत्रीने रस्त्यावर एवढा गोंधळ घातला की, बघ्यांची एकच गर्दी जमली. ही घटना हैदराबादच्या बंजारा हिल्स भागातील आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी कारवाईची मागणी केली आणि अभिनेत्रीवर जोरदार टीका केली.

अभिनेत्री सौम्याच्या या वृत्तीचा नेटकऱ्यांकडून निषेध केला जात आहे. माहितीनुसार, ही घटना रविवार 25 फेब्रुवारी रोजी घडली. बंजारा हिल्समध्ये चुकीच्या रस्त्यावर आपली जग्वार कार चालवत असलेल्या अभिनेत्री सौम्याला ट्रॅफिक होमगार्डने अडवले. व्हिडीओवरील टाइमस्टॅम्पनुसार, शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8.24 च्या सुमारास हा गोंधळ झाला.

पोलिसांत गुन्हा दाखल

सहकार्य करण्याऐवजी सौम्या जानू संतप्त झाली आणि तिच्या मार्गात अडथळा आणल्याबद्दल गार्डला शिवीगाळ केली. सौम्या होमगार्डशी उद्धटपणे वागली. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, या प्रकरणात हस्तक्षेप करूनही अभिनेत्री शांत झाली नाही. ती ओरडत राहिली आणि आरडाओरड करत राहिली.

घटनेची नोंद करणाऱ्या ट्रॅफिक होमगार्डवर तिने हल्ला केल्याने प्रकरण आणखी बिघडले. आश्चर्याची बाब म्हणजे सौम्याने होमगार्डचे कपडे फाडले आणि त्याचा फोनही हिसकावला. अभिनेत्रीने केलेल्या हल्ल्यानंतर ट्रॅफिक होमगार्डने बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली. पुरावा म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडीओही त्यांच्या हाती लागला.

 

Actress अन् एकच राडा

पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचवेळी हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सौम्या जानूवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे तेलगू अभिनेत्री सौम्या जानू कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसत आहे.

सौम्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका होमगार्डसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. व्हिडीओ बनवल्यामुळे अभिनेत्रीने संबंधित गार्डचे शर्ट फाडले आणि त्याचा फोनही हिसकावला, असा आरोप आहे. आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title- A video of Telugu actress Soumya Janu arguing with a home guard is going viral
महत्त्वाच्या बातम्या –

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”

जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत”

वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिकला ईडीचा मोठा झटका!

Join WhatsApp Group

Join Now