मुंबई: भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी बीडमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीसह सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांच्या नावाचा वादग्रस्त उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) तीव्र संताप व्यक्त केला असून, धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील उडी घेतली असून, प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवला आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
बीडमध्ये बोलताना सुरेश धस यांनी, “मला जर इव्हेंट मॅनेजमेंट दिले, तर मी नाचायला प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांना बोलवेन,” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Prajakta Mali संतप्त; महिला आयोगाकडे करणार तक्रार
सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने संताप व्यक्त करत, “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकाराची महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने जाहीर केले आहे.
अमेय खोपकरांचा प्राजक्ताला पाठिंबा
मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला आहे. “सुरेश धस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. कलाकारांचा असा अपमान खपवून घेतला जाणार नाही. प्राजक्ता माळीने याविरोधात आवाज उठवल्याबद्दल तिचे अभिनंदन,” असे ट्विट अमेय खोपकर यांनी केले आहे.
या प्रकारामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून, सुरेश धस यांच्या वक्तव्याचा अनेक स्तरातून निषेध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा






