मुंबई | आजकाल लग्न होऊन वर्षभर सुद्धा काहींचा संसार टीकत नाही. अलीकडं भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. या घटस्फोटाची अनेक कारणं समोर येत आहेत. नुकतंच महिलांचे घटस्फोट का होत आहेत ?, यावर बाॅलीवूडची अभिनेत्री नीना गुप्ता(Neena Gupta) यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत महिलांच्या घटस्फोटाची कारणं सांगितली आहेत. घटस्फोट हा विषय अवघड आहे असं सांगताना त्या म्हणाल्या की, याचं त्याच्याकडं ठोस उत्तर नाही. लोकांना असं वाटतंकी लग्नाची गरज नाही. पण त्यांना असंही वाटतं की त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
पुढं त्या असंही म्हणाल्या की, आजकालच्या मुली सर्वच गोष्टींमध्ये स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. तसेच त्या आर्थिकदृष्ट्याही पुरूषांवर अवलंबून नाहीत. त्यामुळं त्या नवऱ्याकडून काही घेत नाहीत. त्यामुळं घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललं आहे.
आधीच्या स्रियांकडं काही पर्याय नव्हते. म्हणून त्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या, असंही त्या म्हणाल्या. लग्न ही चांगली गोष्ट आहे, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान, नीना ह्या आपल्या बेधडक वक्तव्यामुळं सातत्यानं चर्चेत येत असतात. त्यांनी बऱ्याचदा वैयक्तिक आणि खासगी आयुष्यावर आपली मत मांडली आहेत. यावेळेही त्यांनी महिलांच्या घटस्फोटाबद्दल आपलं मत व्यक्त करत सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
तसेच त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्यांचे सोशल मीडियावर 1 मिलियन फाॅलोवर्स आहेत. सोशल मीडिवार त्यांच्या व्हिडीओ,फोटोला हजारोंमध्ये लाईक्स-कमेंट्स येत असतात. लवकरच त्यांचा ‘वध’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-






