Rajinikanth | सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांना 30 सप्टेंबर रोजी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे. (Rajinikanth)
आज 1 ऑक्टोबररोजी रजनीकांत यांच्या काही महत्वाच्या टेस्ट होणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. आज त्यांच्यावर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया होणार असल्याचं काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
रजनीकांत मध्यरात्री रुग्णालयात दाखल
73 वर्षीय रजनीकांत यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहते देखील चिंतेत पडले आहेत. चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना रजनीकांत (Rajinikanth)यांचे चाहते करत आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांचा संपूर्ण देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले असून आपल्या अभिनयाने त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. त्यांना भारतीय चित्रपटातील उत्कृष्टतेसाठी शेवेलियर शिवाजी गणेशन पुरस्कार मिळाला आहे.
रजनीकांत यांना मिळालेले पुरस्कार
याचबरोबर रजनीकांत यांना 2014 मध्ये भारताच्या 45 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट व्यक्तिमत्वासाठी शताब्दी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 च्या 50 व्या आवृत्तीत आयकॉन ऑफ ग्लोबल ज्युबिली पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच, रजनीकांत यांना 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना (Rajinikanth)रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त रजनीकांत यांची चर्चा आहे.
News Title – Actor Rajinikanth admitted to the hospital
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवे दर?
बाप्पाच्या आशीर्वादाने महिन्याची सुरुवात, पाहा तुमच्या राशीभविष्यात आज काय लिहिलंय?
धक्कादायक! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात
दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत
सरकार म्हणजे विषकन्या; भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य






