Actor Jason Shah | संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ ही वेब सिरिज प्रचंड चर्चेत होती. यातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक झालं. तसेच वेबसिरिज मधील काही सीन्सचीही बरीच चर्चा झाली. अशात या सीरिजमधल्या एका अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
मला सेक्सचं व्यसन होतं, असं या अभिनेत्याने म्हटलं आहे. ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये अभिनेता जेसन शाहने महत्वाची भूमिका साकारली होती. यमध्ये तो इंग्रज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. या सिरिजमुळे जेसन (Actor Jason Shah) प्रकाशझोतात आला.
जेसन शाहचा ‘सेक्स ॲडिक्शन’ विषयी खुलासा
अशात नुकतीच जेसनने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. मुलाखतीत जेसनने त्याच्या ‘सेक्स ॲडिक्शन’ विषयी भाष्य केलं. त्याचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
“मला दारू आणि धुम्रपानाचं व्यसन होतंच. पण माझ्यासाठी शरीरसुखाचं व्यसन सर्वांत कठीण होतं”, असं अभिनेता म्हणाला आहे. त्याचं हे विधान आता चर्चेत आलंय. तसंच या व्यसनाची जाणीव मला काही वर्षांपूर्वी झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला अध्यात्मिक परिवर्तनाची मदत झाली, असंही अभिनेता (Actor Jason Shah) म्हणाला.
View this post on Instagram
“लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं..”
मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला की, “मी दिवसाला दोन ते अडीच सिगारेटची पाकिटं संपवायचो.तेव्हा मला महिलांचंही व्यसन होतं. सेक्स ॲडिक्शन माझ्यासाठी सर्वांत कठीण होतं. ते व्यसन सोडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. एखाद्या गोष्टीतून तुम्हाला सुख मिळत असेल तर ते का करू नये, असा माझा विचार होता. पण, नंतर मला जाणीव झाली. त्यामुळे आता मी काहीही करण्यापुर्वी दोनदा विचार करतो.”, असं अभिनेता जेसन शाह (Actor Jason Shah) म्हणाला आहे.
पुढे अभिनेता म्हणाला की, “सध्या मी ज्या मुलीला डेट करतोय, तिलासुद्धा मी हे स्पष्ट केलंय की लग्न होईपर्यंत आपण सेक्स करायचं नाही. हा बदल माझ्यासाठी चांगला आहे.”, असं जेसन शाह म्हणाला आहे. त्याची ही मुलाखत आता चर्चेत अली आहे.
News Title- Actor Jason Shah Opens Up His Addictions
महत्वाच्या बातम्या-
“मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ मग आम्ही कोण?”; तृतीयपंथीयांचा सवाल
राज्यात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनदर
मोठी बातमी! शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना गांजा तस्करीत अटक
“मराठ्यांचे मत घेईपर्यंत गोड बोलायचं, नंतर..”; जरांगे पाटलांचा खासदार कोल्हे यांच्यावर हल्लाबोल
भर पावसाळ्यात ‘या’ शहरात पाणीटंचाईचे चटके; नागरिकांनो पाणी जपून वापरा!






