Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल दिवसेंदिवस चर्चा सुरु आहेत. प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री अलीकडच्या काळात तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या ऐश्वर्याच्या वागणुकीबाबत बच्चन कुटुंबांतील काही व्यक्तींनी तक्रार केली होती. मात्र सध्या चर्चा आहे ती अभिषेक बच्चनच्या वक्तव्याची.
“आराध्यामुळे माझा दिवस खास”
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिषेकचा वाढदिवस पार पडला. त्याच्या वाढदिवसा दिवशी सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याला ऐश्वर्याने (Aishwarya Rai) देखील आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अभिषेक म्हणाला की, ‘मी माझा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा करू इच्छितो. मात्र, जर मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी काम नाही केले तर तो माझ्यासाठी नक्कीच हॅप्पी नसणार. आराध्यामुळे माझा दिवस खूप खास गेला’.
पुढे काय म्हणाला?
बोलत असताना पुढे अभिषेक म्हणाला की, आराध्या आमच्या बच्चन कुटुंबातील शिवाय जगातील सर्वात वंडरफुल वाईल्ड आहे. आणि याचे सर्व श्रेय मी ऐश्वर्याला देऊ इच्छितो. कारण मला वाटतं ऐश्वर्याने (Aishwarya Rai) आराध्याला कायमच खूप जास्त चांगले संस्कार हे नक्कीच दिले आहेत. यानंतर थेट अभिषेक बच्चन याला विचारले गेले की, तुला ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करायला आवडले का?
ऐश्वर्या सोबत स्क्रिन शेअर करण्याबाबत अभिषेक म्हणाला की, मला अनेकजणांनी मेल करत याबदल विचारलं, तुम्ही ऐश्वर्या राय हिच्यासोबत कधी काम करणार म्हणून? खरोखरंच ऐश्वर्या राय हिच्यासोबत स्क्रिन शेअर करायला आवडेल. मात्र यापुढे आम्ही एकसोबत स्क्रिन शेअर करू, असंही अभिषेक बच्चन हा म्हणाला आहे.
घटस्फोट होणार का?
अनेक दिवसांपासून नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा खरोखर घटस्फोट होणार का?, असा प्रश्न पडत आहे. दरम्यान या दोघांना देखील घटस्फोटाबाबत कायम प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र अजूनही ऐश्वर्या आणि अभिषेक किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी याबाबत भाष्य केलेलं नाहीये.
News Title : abhishek bachchan talks about aishwarya rai and aradhya
महत्त्वाच्या बातम्या-
दंगलफेम सुहानीच्या मृत्यूची अफवा?; अभिनेत्रीच्या ‘त्या’ एका पोस्टमुळे खळबळ
अन् रागाच्या भरात मनोज जरांगे यांनी सलाईन काढून फेकली, वाचा नेमकं काय घडलं?
“..तिथे तुम्हाला ऐश्वर्या राय नाचताना दिसेल”, ‘या’ नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
पुण्यातील हॉटेल्स अन् पब मालकांना पोलीस आयुक्तांचा मोठा दणका!
राज्यातील निवासी डॉक्टरांचा मोठा निर्णय, सरकारला दिला शेवटचा इशारा






