घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल!

On: September 20, 2024 12:09 PM
Abhishek Bachchan buys luxury apartment
---Advertisement---

Abhishek Bachchan | विश्वसुंदरी तथा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहेत. इतकंच नाही तर, दोघांनीही घटस्फोट घेतला असल्याचं देखील मागे म्हटलं गेलं. (Abhishek Bachchan)

ऐश्वर्या आणि अभिषेक गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत. कोणत्याही कार्यक्रमात ऐश्वर्या नेहमीच लेक आराध्या सोबत स्पॉट होते. तर, अभिषेक मात्र वडील अमिताभ आणि आई जया बच्चन यांच्यासोबत स्पॉट होत असतो. नुकतीच ऐश्वर्या ही दुबईला गेली होती. तेव्हा विमानतळावरील तिचा एक व्हिडिओ तूफान व्हायरल झाला होता. तेव्हा अभिनेत्रीच्या हातात साखरपुड्याची अंगठी नव्हती. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या.

अभिषेक बच्चनने खरेदी केलं नवं घर?

ऐश्वर्या हिच्याोसोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिषेक बच्चन याने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने जुहू याठिकाणी आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या शेजारीच अभिषेकने आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे.

‘जलसा’ बंगल्याच्या भोवतीच बच्चन कुटुबियांचे पाच अपार्टमेंट आहेत. आता अभिषेकने नवीन अपार्टमेंट का खरेदी केले असेल, यावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी याबाबत वेगेवगळे अंदाज बांधत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बच्चन कुटुंब चर्चेत आलं आहे. (Abhishek Bachchan)

‘या’ चित्रपटात दिसणार अभिषेक बच्चन

दरम्यान, अभिषेक बच्चनच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास तो नुकताच ‘घूमर’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस आला. यात अभिनेत्री सियामी आणि शबाना आझमी यांच्या देखील मुख्य भूमिका होत्या. आता अभिषेक ‘बी हॅप्पी’ चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात अभिषेक बच्चन एका वडीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात इनायत वर्मा अभिषेकच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर मार्च महिन्यात प्रदर्शित झाले होते. चाहत्यांना आता अभिषेकच्या या नव्या चित्रपटाची आतुरता आहे. (Abhishek Bachchan)

News Title – Abhishek Bachchan buys luxury apartment

महत्त्वाच्या बातम्या-

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, राऊतांच्या वक्तव्यामुळे माविआमध्ये फूट पडणार?

सरकारचा मोठा निर्णय! वीज दर ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार

मोठी बातमी! भाईजानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीच्या फोटोने खळबळ

ठाकरे की शिंदे?, यंदा शिवाजी पार्कवर कोण गाजवणार दसरा मेळावा?

सोनं स्वस्त झालं की महाग?, सराफा बाजारात काय आहेत सध्या दर?

Join WhatsApp Group

Join Now