अवघ्या 48 तासांत अजित पवारांची साथ सोडली, अभिजीत पवारांचा यू-टर्न, केले गंभीर आरोप

On: February 21, 2025 1:38 PM
Maharashtra politics
---Advertisement---

Abhijit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार (Abhijit Pawar) आणि हेमंत वाणी (Hemant Vani) यांनी मंगळवारी (18 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या 48 तासांतच अभिजीत पवार यांनी घड्याळाची साथ सोडून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Abhijit Pawar)

“माझ्यावर प्रचंड दबाव होता, आत्महत्या करण्याचा विचार केला” – अभिजीत पवार

ठाण्यात पत्रकार परिषद घेत अभिजीत पवार यांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, त्यांच्यावर जबरदस्तीने दबाव टाकून अजित पवार गटात सामील होण्यासाठी भाग पाडण्यात आले होते. ते म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल करून मला दोन वर्षे तुरुंगात पाठवण्याचे प्लॅनिंग सुरू होते. मित्रांना पोलिसांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या, तसेच ईडीच्या धाकाने मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात होता.” त्यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा करत सांगितले की, “जर आमदार जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता, तर मी आत्महत्या केली असती.”

“माझा वापर आव्हाडांना अडकवण्यासाठी…”

अभिजीत पवार म्हणाले, “माझा वापर फक्त आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठी केला जाणार होता. मला आधीच याचा अंदाज आला आणि म्हणूनच मी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला.” ते पुढे म्हणाले, “माझ्या आईला आणि पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जण नजीब मुल्ला यांच्याकडून मला धमक्या देत होते.”

अभिजीत पवार (Abhijit Pawar) यांनी स्पष्ट केले की, “आज मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतलो आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मला पुन्हा स्वीकारले नाही तरी मी त्यांना सोडणार नाही.”

अजित पवारांसाठी मोठा धक्का?

अजित पवारांच्या गटात गेल्यानंतर अवघ्या 48 तासांतच यू-टर्न घेतल्याने, हा निर्णय महाविकास आघाडी (MVA) साठी मोठ्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. अजित पवारांनी स्वतः उपस्थित राहून या नेत्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता, त्यामुळे या घडामोडींमुळे त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. आता अजित पवार, शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडून या प्रकरणावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Title : Abhijit Pawar Quits Ajit Pawar NCP in Just 48 Hours 

 

Join WhatsApp Group

Join Now