“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”

Abhijit Panse | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. आता सर्वांचं लक्ष हे पदवीधर निवडणुकीकडे लागलं आहे. लोकसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आगामी पदवीधर निवडणुकीत मनसेनेही उडी घेतली होती. मनसेने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करुन भाजपला मोठा धक्का दिला होता.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेने अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिल्याने येथे भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता होती. पण, आज अचानकच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कोकण पदवीधर निवडणुकीतून अभिजीत पानसे यांची माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

अभिजीत पानसे यांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी अचानक माघार का घेतली, याबाबत वेवेगळे तर्क लावले जात आहेत. अशातच अभिजीत पानसे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, राज ठाकरे बोलले उडी मारा की मारणार, ते बोलले थांबा तर थांबणार, अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसेंनी दिली आहे.

“मी राज साहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. मी पदवीधर निवडणूक लढवणार होतो. पण, देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना माघार घेण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक लढवत नाही. निरंजन डावखरेंना निवडणुकीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”, असंही पुढे अभिजीत पानसे (Abhijit Panse ) म्हणाले.

मनसेने माघार का घेतली?

आज (7 जून) सकाळी भाजपचे आमदार आणि कोकण पदवधीर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान कोकण पदवीधर उमेदवारीवरून दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे मनसेने या निवडणुकीमधून माघार घेतल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, मनसेने या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. पण, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माघार घेतली आहे.

News Title –  Abhijit Panse on Konkan Padvidhar matadar sangh

महत्त्वाच्या बातम्या-

ठरलं! 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBI ने घेतला मोठा निर्णय

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना खुलं आव्हान, म्हणाल्या…

सुप्रिया सुळेंनी विजयानंतर गाठले अजितदादांचे घर; चर्चांना पुन्हा आले उधाण

“चंद्राबाबू आणि नितीशकुमार आज तिकडे तर उद्या आमच्याकडे..”; ‘या’ खासदाराचा खळबळजनक दावा