‘मी कर्नाटकात जाऊन…’; अभिजीत बिचुकले भडकले

On: December 7, 2022 12:41 PM
---Advertisement---

सातारा | महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा वाद पुन्हा उफाळून आला आहे. कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. मंगळवारी देखील कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड झाली होती, त्यांची अडवणूक तेथील नागरिकांकडून केली जात होती.  आता या प्रकरणावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी भाष्य केलं आहे.

अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. मी देखील छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार आहे, असा इशारा अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनी केलंय.

महाराष्ट्रात आणि देशात घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा, असंही बिचुकले म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now