AB de Villiers | एबी डिविलियर्सचा आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा

On: December 9, 2023 2:55 PM
AB de Villiers
---Advertisement---

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून लवकर निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘मिस्टर 360’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या डिव्हिलियर्सने सांगितले की, त्याने आपल्या कारकिर्दीची शेवटची 2 वर्षे डोळ्याच्या दुखापतीत घालवली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एबीने 2018 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा-

एबी डिव्हिलियर्सने ‘विस्डेन मासिका’शी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची 2 वर्षे त्याने त्याच्या डोळ्याच्या दुखापतीसोबत घालवली. वास्तविक पाहता, डिव्हिलियर्सच्या म्हणण्यानूसार, मुलाने त्याच्या डोळ्यात लाथ मारली होती, त्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागली होती.

त्याने (AB de Villiers) सविस्तरपणे सांगितले, की “माझ्या मुलाने चुकून माझ्या डोळ्यावर लाथ मारली, त्याची टाच मला लागल्याने माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, यामुळे माझ्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी होऊ लागली होती.

एबी डिविलियर्स पुढे म्हणाला, “जेव्हा माझी शस्त्रक्रिया पूर्ण झाली, तेव्हा डॉक्टरांनी मला विचारले की दुखापत झाल्यानंतरही तू एवढं क्रिकेट कसं काय खेळलास?, उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती तरी सुदैवाने माझ्या करिअरच्या शेवटच्या दोन वर्षांत माझ्या डाव्या डोळ्याने मात्र खूप चांगलं काम केलं.

एवढ्या लवकर निवृत्ती का घेतली?-

डिव्हिलियर्सनेही इतक्या लवकर निवृत्ती घेण्याच्या आपल्या निर्णयावर त्याने (AB de Villiers) मौन सोडलं आहे. तो म्हणाला, “कोविडने साहजिकच माझ्या निर्णयात खूप मोठी भूमिका बजावली आणि यात मला काही एक शंका नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर २०१५ च्या विश्वचषकाने मला खूप वेदना दिल्या. त्यातून बाहेर यायला मला खूप वेळ लागला आणि त्यानंतर जेव्हा मी संघात परतलो, तेव्हा मी स्वतःला झोकून द्यायला तयार होतो मात्र त्यावेळी संघात चांगलं वातावरण नव्हतं.”

तो (AB de Villiers) पुढे म्हणाला की, “मी अनेकदा विचार करत होतो. मला माहीत नव्हतं हा माझ्या करिअरचा शेवट आहे का? मला आयपीएल किंवा इतर कोणतीही लीग खेळायचीही इच्छा नव्हती. 2018 मध्ये मी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मी पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी स्वत:ला पुश केलं. मला वाटलं की भारत आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करु आणि मग निवृत्ती जाहीर करु. मला त्यावेळी कोणत्याही प्रकारची पब्लिसिटी नको होती. मला एवढेच सांगायचं होतं की माझा कार्यकाळ छान गेला, तुमच्या सर्वांचे धन्यवाद!

News Title: ab de Villiers explanation about his retirement

महत्त्वाच्या बातम्या-

Joe Solomon | क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर!

TET Scam | तुकाराम सुपे पुन्हा अडचणीत, खळबळजनक माहिती समोर

रोहित आणि विराट T20 World Cup 2024 खेळणार नाही?, मोठं वक्तव्य आलं समोर

Pune News | पुण्यात धक्कादायक घटना, आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता

Google Alert | गूगलने 17 Apps हटवले, तुमच्या फोनमध्ये असतील तर आत्ताच काढून टाका

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now