Amir khan | अभिनेता आमिर खानची (Amir khan) मुलगी आयरा खान (ira khan) आणि फिटनेस कोच नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांनी नोंदणी पद्धतीने बुधवारी (3 जानेवारी) लग्न केलं. मुंबईमधील ताज लँड्स एँड या हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचा विवाहसोहळा पार पडला. लग्नात आमिरची पहिली पत्नी रिना दत्तासह त्याची दुसरी पत्नी किरण रावही (Kiran Rao) मुलगा आझाद सोबत उपस्थित होती. सोशल मिडीयावर सध्या आयरा आणि नुपूरच्या लग्नाचीच अधिक चर्चा होत आहे. सध्या लग्नातला एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. किरण राव आणि आमिरचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये आमिर किरण रावला किस करताना दिसून येत आहे. यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
Amir khan ने केलं किरण रावला किस
व्हायरल होणाऱ्या व्हिडओमध्ये आमिर आपली दुसरी पत्नी किरण रावला किस करताना दिसून येत आहे. जावई नुपूर सोबत आमिरचं सर्व कुटुंब स्टेजवर दिसलं. एका बाजूला रीना दत्ता तर दुसऱ्या बाजूला त्याची दुसरी पत्नी किरण राव मुलगा आझाद सोबत उभी आहे.
या क्षणी आमिर किरणकडे जाऊन तिच्यासोबत बोलू लागतो आणि तिला किस करतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आमीर, किरण राव आणि रीना दत्ता सर्व जण एकाच मंचावर दिसून येत आहेत.
View this post on Instagram
Amir khan च्या व्हायरल व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया|
‘यांचं बरं आहे. घटस्फोट घेऊनसुद्धा सर्व काही नॉर्मल आहे. इथे तर जरा भांडण झालं तर एकमेकांचा चेहरा बघत नाहीत लोक’,’हिंमत लागते भावा.आपल्या पहिल्या बायकोसमोर दुसऱ्या बायकोला किस करणं.. हॅट्स ऑफ आमिर भाई’, अशा कमेंट्स सोशल मिडियावर उमटत आहेत.
तर, काही युझर्सनी कपड्यांवरूनही आमीर आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोल केलं आहे. ‘पूर्ण कुटुंबामध्ये फक्त आझादनेच चांगले कपडे परिधान केले आहेत. बाकी सर्व जन तर नमुने दिसत आहेत,’ असं म्हणत नेटकरी ट्रोल करत आहेत. दरम्यान, नोंदणी पद्धतीने झालेल्या या लग्नाचं रिसेप्शन येत्या 8 जानेवारी रोजी उदयपूरमध्ये होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Deepika Padukone ने दिली गुड न्यूज, म्हणाली ‘रणवीर सिंग आणि मी…’
‘तब्बल 16 महिने…’; Sonam Kapoor चा मोठा खुलासा
Sourav Ganguly चा टीम इंडियाला मोलाचा सल्ला!
Aishwarya Rai ने ‘या’ व्यक्तीची भेट घेतली?, व्हिडीओमुळे एकच खळबळ
Mukesh Ambani l Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने आणला जबरदस्त प्लॅन






