आधारकार्ड संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी! UIDAI ने आणलं नवं फीचर

On: November 29, 2025 4:44 PM
Aadhaar Update
---Advertisement---

Aadhaar Update | आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आणि तासन्तास रांगेत उभे राहण्याची समस्या नागरिकांना नेहमीच भेडसावत असते. मोबाईल नंबर बदलण्यासाठी देखील आधार केंद्रातच जावे लागत असल्याने अनेकांना यात अडचणी येत होत्या. आता UIDAI ने एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली असून, यामुळे आधार अपडेट प्रक्रिया अगदी सोपी होणार आहे. घरबसल्या मोबाईल नंबर बदलणे आता शक्य होणार असल्याने लाखो नागरिकांना याचा मोठा फायदा मिळेल.

UIDAI ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर या नव्या फीचरची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, लवकरच नवीन आधार अॅपमध्ये OTP आणि फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने मोबाईल नंबर अपडेट करता येईल. यामुळे केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही आणि अपडेट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे.

मोबाईलवरूनच नंबर अपडेट, फेस ऑथेंटिकेशनची सोय :

UIDAI च्या नव्या अॅपमध्ये फेस स्कॅनिंगची सुविधा दिली जाणार आहे. युजरने फक्त मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करून आपला चेहरा स्कॅन करायचा आणि OTP टाकायचा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट होईल. फेस ऑथेंटिकेशनमुळे फसवणूक किंवा चुकीचे अपडेट होण्याची शक्यता कमी राहणार आहे.

सध्या हे फीचर टेस्टिंगमध्ये असून लवकरच सर्वांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. UIDAI ने जरी नेमकी रिलीज तारीख जाहीर केलेली नसली तरी त्यांनी “Comming Soon!” असे नमूद केले आहे. म्हणजेच काही दिवसांतच सर्व युजर्सला घरबसल्या आधार अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे.

Aadhaar Update | नवीन आधार अॅपमध्ये अनेक आधुनिक फीचर्स

UIDAI ने काही दिवसांपूर्वी अँड्रॉइड आणि आयफोनसाठी नवीन आधार अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे आधारची माहिती डिजिटलरी शेअर करणे आणखी सुरक्षित होणार आहे. QR कोडद्वारे आधार माहिती शेअर करता येईल, त्यामुळे फोटोकॉपी किंवा ऑफलाइन डिटेल्स देण्याची गरज राहणार नाही. ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.

याशिवाय UIDAI एक स्वतंत्र व्हेरिफिकेशन अॅपही विकसित करत आहे. हॉटेल्स, लॉज किंवा जिथे ओळख पडताळणी आवश्यक असते, तिथे फक्त QR कोड स्कॅन करून आधार तपासता येणार आहे. यामुळे संपूर्ण KYC प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि डिजिटल होईल.

News Title: Aadhaar Update From Mobile: UIDAI to Launch Face Authentication Feature to Change Mobile Number at Home

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now