मुकेश अंबानी धमकी प्रकरण; चौकशीतून झाला मोठा खुलासा

On: November 5, 2023 1:00 PM
---Advertisement---

मुंबई | रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना गेले काही दिवस धमकीचे फोन, मेल्स येत होते. आंबानींला एका पाठोपाठ चार ते पाच वेळा धमकीचे मेल्स आल्याने या प्रकाराबाबत पोलिसांनी तपास सुरु केला होता.

अंबानींना मेल करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून हे आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थ्यी असल्याचं समोर आलं आहे. माध्यमांच्या माहितीनुसार एक आरोपी गुजरातचा आहे तर दुसरा तेलंगणाचा असल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण दोन्ही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणाने केल्याचं दिसत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबई गुन्हे शाखेच्या, क्राईम इंटेलिजेंस युनिटने ही कारवाई केली आहे. गुजरात येथील गांधीनगरमधील कल्लोल येथील राजवीर खंत नावाच्या 21 वर्षीय तरुणाला अटक केली. खंत याने [email protected] या ईमेलवरुन त्याने शादाब खान या नावाने हा धमकीचा मेल पाठवत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

उद्योगपतीने त्याच्या मेलला प्रतिसाद न दिल्याने मागणी वाढवून 400 कोटी रुपये केली. गुजरात येथील अटक केलेला दुसऱ्या आरोपीचं नाव गणेश वनपारधी हा 19 वयाचा असून याने मीडियामधील धमकीच्या मेलचे वृत्त वाचून एक मेल पाठवला.

या प्रकरणातील सहावा धमकीचा मेल त्याच्या ईमेल आयडीवरून आल्याचं पोलिसांनी सांगितलं. गणेशने त्यानंतर धमकीचा मेल करत 500 कोटींची मागणी केली. गणेशला कोर्टात हजर केले असता त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजेच राजवीर खंत हा कम्प्यूटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकत आहे. डार्क वेबसाठी तो तासन तास संगणक वापरत होता. डार्क वेब इंटरनेटचाच एक भाग आहे.

थो़डक्यात बातम्या- 

‘तुमचे 50% कुठे…’; नाशिक लाचप्रकरणी धक्कादायक माहिती समोर

“वेळ काळ सांगा मी लढायला तयार”, सुषमा अंधारेंचं ‘या’ नेत्याला थेट चॅलेंज

लोकांची दिवाळी गोड!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा

“आम्हाला जिवंत जाळण्याचा प्लॅन होता”, माजी आमदाराच्या आरोपांनी खळबळ

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसणार?, “आता उरलेले आमदार…”

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now