ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

On: October 21, 2023 11:26 AM
---Advertisement---

नाशिक | ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणी तपासातून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आल्याचं समोर आले आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी सराफा व्यावसायिकाची चौकशी होणार आहे.

ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलने येथील सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोनं खरेदी केलं असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणं बाकी असल्याचं सांगण्यात आलंय.

हे उर्वरित सोने कुठे लपवलं याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केलं, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे सराफ व्यावसायिकासोबतचं कनेक्शन उघड होणार आहे. 

दरम्यान, आतापर्यंतच्या चौकशीत ललित पाटील हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्सचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती कॉल रेकॉर्डिंग वरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय प्रोफाइल ड्रग्स बनवून तो इंटरनॅशनल ड्रग्स बनवण्याचा प्रयत्न करणार होता, अशी देखील माहिती पोलिसांना आतापर्यंत त्याच्या चौकशी मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now