मोठी बातमी! सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट

On: March 11, 2023 11:22 AM
---Advertisement---

मुंबई | हृदयविकाराच्या झटक्याने सतिश कौशिक (Satish Kaushik) यांचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. मात्र दिल्ली पोलिसांना याबाबत वेगळाच संशय येत आहे.

साऊथ वेस्ट दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होळीची पार्टी होती. याच होळीच्या पार्टीत सतिश कौशिकही सहभागी झाले होते. पोलिसांनी या फार्म हाऊसचा कसून तपास केला आहे. या तपासात पोलिसांना काही औषधे सापडली आहे.

यात डायजीन आणि शुगरची नियमित औषधेही आहेत. त्याशिवाय इतरही काही औषधे सापडली आहेत. ही औषधे कोणती आहेत? ती आजारांवरचीच आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात काहीच संशयास्पद नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. अधिक चौकशीसाठी रक्त आणि हृदय बाजूला ठेवण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now