आंदोलन पेटलं! मराठा आंदोलकांनी उचललं मोठं पाऊल

On: October 29, 2023 4:41 PM
---Advertisement---

जालना | मराठा आरक्षणावरुन राज्यात दिवसेंदिवस वातावरण तापत चाललंय. मराठा आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील (Jarange Patil) म्हणाले की जोपर्यंत माझ्या जिवात जिव आहे तोपर्यंत माझ्यासोबत येऊन चर्चा करा.

मराठा आरक्षणावर आमरण आंदोलन करुन सुद्धा सरकार याच्यावर कोणताच तोडगा काढत नाहीय. त्यामुळे मराठा समाज आक्रमक होत आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता तहसीलदाराच्या गाडीवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

मराठा समाज आक्रमक होऊन त्यांनी जालना येथी अंतरवाली सराटी गावातील तहसीलदार लवकर भेटायला न आल्याने संताप व्यक्त करत त्यांच्या गाडीवर हल्ला केला. जालना मंठा रोडवरील बाजी उमरद फाट्यावर ही घटना घडली आहे.

मराठा आंदोलकांकडून जालना मंठा रोडवर रस्ता रोको सुरू होता. दरम्यान, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून तहसीलदार छाया पवार देखील घटनास्थळी आहेत. नेत्यांना गावबंदी केल्यानंतर आता मराठा बांधवांचं पुढचं लक्ष्य शासकीय अधिकारी आहेत. आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्याने संतापलेल्या आंदोलकांनी तहसीलदारांनी गाडीच्या काचा फोडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now