पुन्हा तेच घडलं…; गौतमी पाटीलला मोठा धक्का

On: October 12, 2023 12:35 PM
---Advertisement---

सोलापूर | नृत्यांगना गौतमी पाटीलला (Gautami Patil) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला वेगवेगळ्या शहारांमध्ये बंदी घालण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा तिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली गेलीये. सोलापूरात गौतमीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.

नवरात्रीमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तासाठी वापरलं जातं यामुळे गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिलं आहे. गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती.

दरम्यान, यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली होती. सिंधुदुर्गातील कडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र गौतमीच्या या कार्यक्रमाला विरोध करत नेटिझन्सनी टीकेची झोड सुरू केली. या कार्यक्रमाला होणारा विरोध लक्षात घेता आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now