मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांना मोठा झटका!

On: January 6, 2023 5:11 PM
---Advertisement---

मुंबई | माजी मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणी आणखी वाढल्या आहेत. नवाब मलिक यांचा जेलमधील मुक्काम वाढलाय. यामुळे ते आणखी अडचणीच आलेत.

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता.

नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, याआधीही मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे कुर्ल्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबईतल्या कुर्ला इथल्या जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे. जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे, असाही आरोप त्यांच्यावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now