SUV खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! जानेवारी महिन्यात 5 मिडसाईज SUV बाजारात येणार

On: December 14, 2025 4:22 PM
Upcoming SUV In January 2026
---Advertisement---

Upcoming SUV In January 2026 | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑटोमोबाईल बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. जानेवारी 2026 मध्ये मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकापाठोपाठ एक तब्बल पाच नवीन गाड्या लॉन्च होण्याची तयारी सुरू आहे. टाटा मोटर्स, किआ, रेनॉल्ट, स्कोडा आणि मारुती सुझुकी या दिग्गज कंपन्यांच्या गाड्या यामध्ये समाविष्ट असणार आहेत.

ऑटो क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, या एसयूव्हींच्या किमती बजेट-फ्रेंडली ठेवण्यावर कंपन्यांचा भर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दमदार इंजिन, अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स, आकर्षक डिझाइन आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह या गाड्या ग्राहकांच्या भेटीला येणार आहेत.

New-Gen Kia Seltos :

ऑल-न्यू किआ सेल्टोससाठी देशभरात बुकिंग आधीच सुरू झाले असून, 2 जानेवारी 2026 रोजी अधिकृत किंमती जाहीर होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या मध्यापासून डिलिव्हरी सुरू होईल.

नवीन सेल्टोस मागील मॉडेलपेक्षा 95 मिमी लांब, 30 मिमी रुंद असून व्हीलबेसही 80 मिमीने वाढवण्यात आला आहे. डिझाइनमध्ये किआ टेलुराइडची झलक पाहायला मिळते. सेगमेंट-फर्स्ट फीचर्ससह ही एसयूव्ही सध्याच्या इंजिन ऑप्शन्समध्येच उपलब्ध राहणार आहे.

Upcoming SUV In January 2026 | New Renault Duster :

तिसऱ्या पिढीची रेनॉल्ट डस्टर 26 जानेवारी 2026 रोजी भारतात लॉन्च होणार आहे. CMF-B प्लॅटफॉर्मवर आधारित ही एसयूव्ही पूर्णपणे नवीन डिझाइन आणि अधिक प्रीमियम इंटिरियरसह येणार आहे. भारतात ही कार 1.0 लिटर आणि 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह सादर केली जाण्याची शक्यता आहे. (Upcoming SUV In January 2026)

Skoda Kushaq Facelift :

2026 स्कोडा कुशाक फेसलिफ्टमध्ये मोठे कॉस्मेटिक बदल नसले तरी फीचर्समध्ये महत्त्वाचे अपग्रेड मिळणार आहेत. लेव्हल-2 ADAS, पॅनोरामिक सनरूफ यांचा समावेश अपेक्षित आहे. सध्याचे 1.0L आणि 1.5L TSI पेट्रोल इंजिन कायम राहणार असून, 1.0L इंजिनसोबत नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात येण्याची शक्यता आहे.

Tata Sierra EV :

टाटा सिएरा EV 2026 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. डिझाइन आणि इंटिरियर ICE मॉडेलप्रमाणेच राहणार असून, EV-स्पेसिफिक बदल करण्यात येतील. सिएरा EV मध्ये Harrier EV मधील 65kWh आणि 75kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून, यामुळे दमदार रेंज मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Maruti e Vitara :

मारुती सुझुकीची ई-विटारा 2026 च्या सुरुवातीला बाजारात दाखल होणार आहे. ही एसयूव्ही डेल्टा, झेटा आणि अल्फा अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळणार आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये मोठ्या बॅटरी पॅकसह सुमारे 542 किमी रेंज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. (Upcoming SUV In January 2026)

एकूणच, जानेवारी 2026 हा महिना एसयूव्ही खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स असलेल्या अनेक पर्यायांचा मोठा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

News Title : 5 Budget-Friendly Mid-Size SUVs Launching in January 2026 – Kia, Tata, Renault, Skoda, Maruti

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now