पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 31 मार्चआधी ‘हे’ काम करून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

On: February 18, 2025 10:03 AM
Vehicles Number Plate
---Advertisement---

Vehicles Number Plate l राज्य परिवहन विभागाने (State Transport Department) ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (High Security Registration Plate – HSRP) 2019 पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. वर्ष 2019 पूर्वीच्या पुणे (Pune) प्रादेशिक परिवहन विभागात जवळपास 25 लाख वाहने आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले असून, ही नंबरप्लेट बसविण्यास सुरुवात झाली आहे. पण वाहनचालकांचा म्हणावा असा प्रतिसाद अद्याप मिळत नाही.

आतापर्यंत सात ते आठ हजार वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. तर, तेवढ्याच वाहनांचे नंबर प्लेट बसविण्यासाठी अर्ज आले आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे शक्य नाही. त्यामुळे परिवहन विभागाने ही नंबरप्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती.

चालकांनी प्रतिसाद द्यावा :

2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहनधारकांनी 30 एप्रिलपूर्वी नंबर प्लेट बसवून घ्यावी. 2019 पूर्वीच्या एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट बसविण्याचे आदेश आरटीओंनी (RTO) काढले. परंतु वाहनधारकांकडून याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. 30 एप्रिलनंतर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नसेल त्यांना दंड भरावा लागणार आहे. म्हणून वाहनचालकांनी प्रतिसाद द्यावा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी म्हटलंय.

पुण्यात 25 लाख वाहने :

पुणे आरटीओकडे (RTO) 40 लाख वाहनांची नोंद आहे. त्यात 2019 पूर्वीची 25 लाख वाहने आहेत. पैकी केवळ 10 हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवली असून 25 लाख बाकी आहेत.

News title : 25 Lakh Vehicles to Change Number Plates!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now