2026 Lucky Zodiac Sign | नवीन वर्षाच्या सुरुवातीबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असते. येणारं वर्ष कसं जाणार, कोणासाठी भाग्यवान ठरणार आणि कोणाला मेहनतीची अधिक गरज भासणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 या वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ योगांनी होत असून 1 जानेवारी 2026 हा दिवस खास मानला जात आहे. (New Year Astrology 2026)
ज्योतिषीय गणनांनुसार, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 6 शुभ योग आणि अनेक राजयोग तयार होत आहेत. ग्रहांच्या या विशेष स्थितीमुळे तीन राशींच्या जीवनात धन, यश, आनंद आणि भरभराटीची सुरुवात होणार आहे. नववर्षाचा पहिला दिवसच या राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
1 जानेवारी 2026 रोजी तयार होणारे शक्तिशाली योग :
ज्योतिषशास्त्रानुसार, 1 जानेवारी 2026 रोजी प्रदोष व्रत साजरे केले जाईल. याच दिवशी रोहिणी नक्षत्र, रवि योग आणि शिववास योगाचा संयोग पाहायला मिळणार आहे. याशिवाय मंगलादित्य योग, शुक्रादित्य योग आणि बुधादित्य योगही तयार होत आहेत. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ हे चार ग्रह मकर राशीत एकत्र येत असल्याने चतुर्ग्रही राजयोग निर्माण होणार आहे.
विशेष म्हणजे हे अनेक राजयोग शनीच्या राशीत तयार होत आहेत. 2026 हे सूर्याचे वर्ष मानले जात असताना, सूर्य आणि शनी हे परस्पर शत्रू ग्रह आहेत. अशा स्थितीत शनीच्या राशीत चार ग्रहांची युती होणे आणि राजयोग तयार होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या योगांचा प्रभाव अनेक लोकांना आर्थिक स्थैर्य, मान-सन्मान आणि करिअरमध्ये मोठी प्रगती देणारा ठरणार आहे.
2026 Lucky Zodiac Sign | या तीन राशींसाठी 2026 ठरणार सुवर्णकाळ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 ची सुरुवात अत्यंत लाभदायक ठरणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. गुंतवणूक, मालमत्ता खरेदी किंवा मोठे आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष आर्थिक दृष्ट्या भरघोस लाभ देणारे ठरेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनेल. नोकरी करणाऱ्यांसह व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरणार आहे. विवाहित जीवनात आनंद आणि प्रेम वाढेल, तर कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. (2026 Lucky Zodiac Sign)
धनु राशीच्या लोकांसाठीही हे राजयोग अत्यंत फलदायी ठरणार आहेत. करिअरमध्ये प्रगती होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. थकीत पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घर, वाहन किंवा स्थावर मालमत्ता खरेदीचे योग आहेत. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, तर व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि संधी मिळतील. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद वाढेल.






