पीएम किसान योजनेत मोठा गैरप्रकार, कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातच घडला धक्कादायक प्रकार

On: March 29, 2025 11:59 AM
181 Fake Beneficiaries Booked in PM Kisan Scam
---Advertisement---

PM Kisan Scam | नाशिक जिल्ह्यात कृषिमंत्र्यांच्या गृहनगरातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या गैरवापराचा मोठा प्रकार उघड झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर आता 181 बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PM Kisan Scam )

कळवण तालुक्यात 181 बनावट लाभार्थी 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळवण (Kalwan) तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांची यादी तपासली असता भादवण या गावात 181 बोगस नावे आढळून आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही दिवसांपूर्वी कळवण कृषी कार्यालय आणि पोलीस ठाण्याला भेट देऊन हा प्रकार उजेडात आणला होता. त्यांनी आरोप केला की, यादीतील लाभार्थ्यांमध्ये बांगलादेशी नागरिक असून, भादवण गावात एकही मुस्लिम कुटुंब अस्तित्वात नसताना सर्व नावे मुस्लिम समाजातील आहेत.

या बोगस लाभार्थ्यांचा गावाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी नमूद केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी योजना बिनदिक्कतपणे लाटल्या जात असल्याने संबंधित यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

पश्चिम बंगाल-बांगलादेश सीमेवरून आलेल्या घुसखोरांचा संशय

किरीट सोमय्या यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदार, कृषी अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त बैठकीनंतर कारवाईस सुरुवात झाली. यानंतर कळवण पोलीस ठाण्यात 181 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संबंधित लाभार्थी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश सीमेच्या भागांतील असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अशा प्रकारे गैरवापर झाल्याने संपूर्ण यंत्रणेची जबाबदारी आणि माहिती पडताळणीची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे. आता या प्रकरणात अधिक चौकशी होणार असून दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

Title : 181 Fake Beneficiaries Booked in PM Kisan Scam

 

Join WhatsApp Group

Join Now