New Delhi Stampede | मुजफ्फरपूरच्या ११ वर्षीय सुरूचीचा (Suruchi) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. सुरूचीचे कुटुंब बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरपूर गावात राहते. सुरूचिीआपल्या नाना-नानींसोबत प्रयागराजला जात असताना रेल्वे स्थानकावर अचानक चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ती आणि तिचे नाना-नानी तिघेही मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे सुरूचीच्या गावात शोककळा पसरली असून तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबावर कोसळले दुःखाचे सावट
सुरूचीच्या आजी सुनैना देवी यांनी सांगितले की, सुरूची काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत दिल्लीत राहत होती आणि तिथेच सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. तिचे मामा-मामी समस्तीपूर जिल्ह्यातील कोठिया येथे राहतात. तिचे नाना विजय साह आणि नानी कृष्णा देवी एक दिवस आधी दिल्लीला गेले होते आणि सुरूचीला घेऊन प्रयागराजला जात होते. मात्र, अचानक झालेल्या चेंगराचेंगरीमुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुरूचीच्या कुटुंबीयांना रात्री उशिरा ही दुःखद बातमी मिळाली. तिचे वडील मनोज साह दिल्लीत गाडी चालवतात आणि त्यांना मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर ते सुन्न झाले. दादा नरेश साह यांनी सांगितले की, “रात्री १२ वाजता फोन आला आणि सांगितलं की सुरूची, तिचे नाना आणि नानी आता जगात नाहीत.” या घटनेने संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
प्लॅटफॉर्मवरील दुर्घटनेनंतर प्रशासनाची प्रतिक्रिया
New Delhi Stampede: ही दुर्घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १६ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर घडली. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी दुःख व्यक्त केले आहे. भारतीय रेल्वेने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार, मृतकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी देखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून, बिहार सरकारकडून मृतकांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केले आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना धैर्य मिळावे अशी प्रार्थना केली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
English Title: 11-Year-Old Suruchi Dies in New Delhi Stampede
चिकन खाणाऱ्यांनो सावधान! डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची अभिनेत्रीकडून पोलखोल, म्हणाली त्या रात्री गाडीतच…






