दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

On: May 6, 2024 6:40 PM
10th Passed Job offer    
---Advertisement---

10th Passed Job | बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या अडचणींमुळे दहावीनंतर शिक्षण घेताच येत नाही. मग, अशा तरुणांना मिळेल ते काम करावं लागतं. मात्र, आता अशा तरुणांसाठी देखील नोकरीची संधी चालून आली आहे. या लेखात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

उत्तर रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत गट डी पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता लगेच अर्ज भरू टाका.

उत्तर रेल्वे रिक्रूटमेंट ड्राइव्ह 2024 अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड क्रीडा चाचणीतील कामगिरीच्या आधारे होईल. आता यासाठी पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल ते जाणून घेऊयात.

एकूण जागा किती?

उत्तर रेल्वेने एकूण 38 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी विविध खेळांमधून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच संबंधित खेळाचे आवश्यक क्रीडा प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2024 रोजी 18-25 वर्षे असायला हवे.या पदांसाठी वयात कोणतीही सूट दिली जाणार नाही.

अर्ज करण्याची तारीख : पात्र उमेदवार (10th Passed Job) उत्तर रेल्वेमधील या गट डी पदांसाठी 16 मे 2024 रोजी किंवा त्यापूर्वी rrcnr.org वर ऑनलाइन भेट देऊन अर्ज करू शकतात. उत्तर रेल्वे भरती 2024 साठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया 10 जून 2024 रोजी केली जाईल.

अर्ज कसा करणार?

उत्तर रेल्वेची अधिकृत वेबसाइट https://www.rrcnr.org/ यावर भेट द्या.
वेबसाइटच्या होमपेजवर उत्तर रेल्वे रिक्रूटमेंट 2024 वर क्लिक करा.
यावर एक फॉर्म येईल. तो काळजीपूर्वक भरा.
अर्ज भरल्यानंतर ‘सबमिट’ बटणावर (10th Passed Job) क्लिक करा.
यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

News Title – 10th Passed Job offer    

महत्त्वाच्या बातम्या-

बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके

रोहित पवारांचा धक्कादायक दावा; अजित पवार अडचणीत?

“..तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं”; नाशकात शांतीगिरी महाराजांनी वाढवलं महायुतीचं टेंशन

नाशिकच्या राजकारणात जरांगे पाटलांची एंट्री?; घडामोडींना वेग

येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ

Join WhatsApp Group

Join Now