चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा? नेटकऱ्यांनी लावला तर्क; ‘मिस्ट्री मॅन’सोबतचा फोटो व्हायरल

On: March 3, 2024 10:58 AM
Yuzvendra Chahal Wife
---Advertisement---

Yuzvendra Chahal Wife | टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. असे असूनही तो सतत चर्चेत कायम असतो. चहलची पत्नी धनश्री वर्मा ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोची स्पर्धक म्हणून दिसली होती. धनश्री पेशाने कोरियोग्राफर असून ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आता तिचा एक मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यानंतर नेटकऱ्यांनी चहल आणि धनश्रीमध्ये का रे दुरावा असल्याचा तर्क लावला आहे.

खरं तर जोडप्याच्या विभक्त झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 27 वर्षीय मॉडेल आणि डान्सर धनश्री एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. युझवेंद्र चहल क्रिकेटपासून दूर असला तरी तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकतेच तो पत्नी धनश्री वर्मासाठी लोकांकडे मते मागताना दिसला. त्याच्या पत्नीने ‘झलक दिखला जा’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

 

चहल-धनश्रीमध्ये का रे दुरावा?

त्यामुळे आपल्या पत्नीला विजयी करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसला. मात्र, काही दिवसांतच दोघांमध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अचानक सोशल मीडियावर या दोघांबद्दल अशा गोष्टी बोलल्या जात आहेत.

धनश्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे. खरं तर प्रतीक उतेकर असे या व्यक्तीचे नाव आहे. तो देखील पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे. हे पाहिल्यानंतर चहल आणि धनश्री वेगळे झाले असावेत असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. मात्र, ही केवळ चर्चा आहे.

 

Yuzvendra Chahal Wife फोटो व्हायरल

सोशल मीडियावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी व्हायरल फोटोचा दाखला देत युझीची फिरकी घेतली. गेल्या एक वर्षापासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या युझवेंद्र चहलला अलीकडेच बीसीसीआयने वार्षिक करार यादीतून काढून टाकले. अशा स्थितीत त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे फार कठीण झाले आहे. आता हा खेळाडू आगामी आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. सलामीचा सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना रांची येथे खेळवला जाईल.

News Title- A photo of Team India player Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma with a mystery man is going viral
महत्त्वाच्या बातम्या –

लोको पायलट क्रिकेट मॅच पाहत राहिल्याने अपघात; 14 जणांचा मृत्यू, रेल्वे मंत्र्यांचा मोठा खुलासा

किशन-अय्यर वादात गांगुलीची दादा’गिरी’! जय शाहंना दिला मोलाचा सल्ला

भाजपकडून मोठा धक्का, या खासदाराचं नाव यादीत नसल्याने महाराष्ट्रात खळबळ

झालं झिंग झिंग झिंगाट…! रिहानासोबत जान्हवीचे ‘भारी’ ठुमके; अदांवर सारेच फिदा

युझी चहलचा संगीता फोगाटसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांनी घेतली शाळा!

 

Join WhatsApp Group

Join Now