Yuzvendra Chahal RJ Mahvash l टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि प्रसिद्ध आरजे महावश यांचं नातं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. दोघांमध्ये काहीतरी ‘स्पेशल’ सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. आता एका नवीन व्हिडिओमुळे या अफवांना आणखी जोर मिळाला असून, चाहतेही या नात्यावर शिक्कामोर्तब करताना दिसत आहेत.
विमानतळाबाहेर चहलसोबत दिसली महावश, व्हिडिओ व्हायरल :
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आरजे महावश (RJ Mahvash) आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) विमानतळाबाहेर एकत्र दिसत आहेत. दोघेही एकमेकांच्या उपस्थितीत अत्यंत आनंदी वाटत होते. अगदी आनंदात महावश पंजाब संघाच्या बसमध्ये प्रवेश करताना दिसते. याच गोष्टीवरून नेटिझन्सना वाटत आहे की, महावश चहलच्या अगदी जवळची व्यक्ती आहे.
सामान्यतः कोणत्याही IPL संघाच्या बसमध्ये फक्त खेळाडू आणि त्यांचे अधिकृत निकटवर्तीयच बसू शकतात. त्यामुळे महावशचा असा प्रवेश चहलच्या खासगी नात्याची स्पष्ट खूण मानली जात आहे.
Yuzvendra Chahal aur RJ Mahvash to Fevicol hote ja rahe ???? pic.twitter.com/qCBJ6vfkC3
— बलिया वाले 2.0 (@balliawalebaba) April 20, 2025
Yuzvendra Chahal RJ Mahvash l ख्रिसमसपासून चहल-महावशची जवळीक चर्चेत :
चहल (Yuzvendra Chahal) आणि महावश (RJ Mahvash) यांचं नाव एकत्र येण्याची सुरुवात 2024 च्या ख्रिसमसपासून झाली. दोघांनीही सोशल मीडियावर ख्रिसमसचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांचं एकत्र असणं स्पष्ट दिसत होतं. यानंतर, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दुबईमध्येही दोघे एकत्र पाहिले गेले. आणि आता IPL 2025 दरम्यान पुन्हा एकदा हे प्रेमसंबंध चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) मार्च 2025 मध्ये आपली पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanshree Verma) घटस्फोट घेतला. त्याआधीपासूनच महावशसोबत त्याचे संबंध असल्याच्या चर्चा होत्या. घटस्फोटानंतर या चर्चांना अधिकच वेग आला आणि सध्या सोशल मीडियावर “चहल-महावश” हे नवं कपल बनलं आहे.
नेटिझन्सकडून या नात्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी वैयक्तिक आयुष्याचा सन्मान राखण्याची विनंती केली आहे.






