युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाचं धक्कादायक कारण समोर!

On: February 21, 2025 6:58 PM
yuzvendra chahal
---Advertisement---

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट अखेर अधिकृत झाला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते, ज्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. समोर आलेल्या माहितीनूसार दोघेही वांद्रे फॅमिली कोर्टात (Bandra Family Court) उपस्थित होते, जिथे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या.

घटस्फोटासाठी 18 महिन्यांची वेगळी राहणीशैली-

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी दोघांना 45 मिनिटांच्या समुपदेशन सत्रात सहभागी होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना अंतिम निर्णयाबाबत विचारण्यात आले असता, दोघांनीही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.

दोघांनी आपल्या नात्यातील दुराव्याचे खरे कारण देखील स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “एकमेकांशी सुसंवाद आणि समजुतीचा अभाव” यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. तसेच, ते मागील 18 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. सर्व औपचारिक चर्चा झाल्यानंतर न्यायालयाने अधिकृतपणे त्यांचा घटस्फोट जाहीर केला आणि युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे आता कायदेशीररित्या पती-पत्नी राहिले नाहीत, असे घोषित केले.

पोस्टमधून भावनिक प्रतिक्रिया-

घटस्फोटाच्या आधीच चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक संदेश शेअर केला होता. त्यात तो म्हणतो, “देवाने मला अनेक वेळा वाचवले आहे, ज्या वेळी मलाही त्याच्या उपस्थितीची जाणीव नव्हती. त्या प्रत्येक क्षणासाठी मी देवाचे आभार मानतो.”

त्याच्या या पोस्टनंतर काही वेळातच धनश्री वर्मानेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, “देव आपल्या चिंता आणि संकटांना आशीर्वादात बदलतो. जर तुम्ही आज काहीतरी त्रासदायक वाटत असेल, तर तुम्हाला निवड आहे.

तुम्ही चिंता करत राहू शकता किंवा ते सर्व देवावर सोपवून प्रार्थना करू शकता. विश्वासात मोठी ताकद असते.” या दोन्ही पोस्टमधून दोघांच्या मनस्थितीचा अंदाज येतो. आता त्यांच्या घटस्फोटानंतर चाहत्यांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

News Title : Yuzvendra Chahal & Dhanashree Verma Officially Divorced

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now