धनश्री वर्माच्या सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण, म्हणाली…

On: January 27, 2025 3:25 PM
Dhanshree verma
---Advertisement---

Dhanashree Verma l टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या त्याची पत्नी, प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्यासोबतच्या घटस्फोटामुळे (Divorce) चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social Media) दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो (Unfollow) केले असून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे चित्र आहे.

दोघांमध्ये मतभेद असल्याच्या अफवाही पसरवल्या जात आहेत. दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून आता धनश्रीच्या एका पोस्टमुळे (Post) या चर्चेला आणखीनच उधाण आले आहे.

धनश्री वर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या मनातील भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वीच धनश्रीने आपल्या चित्रपटाचे (Film) काम पूर्ण केले. त्यानंतर आता तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आनंदी दिसत आहे. “तुम्हीच तुमचे नशीब घडवा, एका वेळी एकच काम करा,” असे ती या व्हिडिओमधून सांगताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये धनश्री कुंभारकाम (Pottery) करताना दिसतेय. तिने मातीपासून भांडी तयार करण्याचा क्लास लावला आहे. त्याचा एक व्हिडिओ हलक्या-फुलक्या अंदाजात मांडत तिने एक सूचक विधान केले आहे.

युजवेंद्र चहलची ‘ती’ पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय :

काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी (Story) पोस्ट केली होती. फोटो शेअर करत त्यासोबत एक कॅची (Catchy) कॅप्शन (Caption) दिले होते. युजीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खरं प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे.” यासोबत युजवेंद्रने एक हसण्याचा इमोजी (Emoji) शेअर केला आहे. त्यामुळे चहलच्या मनात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. अशातच सोशल मीडियावर दोघांच्या या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

दरम्यान, या दोघांनी २०२० मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. परंतु, दोघांमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. युजवेंद्रने धनश्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट (Delete) केले आहेत. तर, धनश्रीने युजवेंद्रचे आडनावही आपल्या नावासमोरून हटवले (Removed Surname) आहे.

News Title: yuzvendra-chahal-dhanashree-verma-divorce-rumors-social-media-posts

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now