चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटामागचं धक्कादायक कारण समोर!

On: February 21, 2025 11:52 AM
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce Confirmed
---Advertisement---

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma | भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाला आहे. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात (Family Court) घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

न्यायालयात काय घडले?

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीसाठी दोघेही गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून न्यायालयात हजर होते. न्यायाधीशांनी दोघांना समुपदेशनासाठी (counseling) पाठवले, जेथे सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर, युजवेंद्र आणि धनश्रीने न्यायाधीशांना सांगितले की ते परस्पर सहमतीने घटस्फोट घेत आहेत आणि गेल्या 18 महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत आहेत.

घटस्फोटाचे कारण

परस्पर संमतीने घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये, जोडप्याने कमीतकमी एक वर्ष विभक्त राहणे आवश्यक असते. युजवेंद्र आणि धनश्रीने वेगळे होण्याचे कारण ‘कम्पॅटिबिलिटी’ (compatibility) संबंधी समस्या असल्याचे सांगितले. सर्व बाबी लक्षात घेऊन, न्यायाधीशांनी दुपारी 4.30 वाजता घटस्फोटाचा निर्णय दिला आणि जाहीर केले की आता ते दोघे पती-पत्नी नाहीत.

लग्नाला चार वर्षे

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. (Yuzvendra Chahal-Dhanashree Verma)

चाहत्यांसाठी धक्का

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या, पण दोघांनीही यावर अधिकृतपणे काहीही सांगितले नव्हते. यावर्षीच्या सुरुवातीला दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते, तेव्हापासूनच त्यांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क लढवले जात होते.

Title : Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce Confirmed

 

Join WhatsApp Group

Join Now