युवराज सिंगच आयुष्य उलगडणार मोठ्या पडद्यावर; कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका?

On: August 21, 2024 2:07 PM
Yuvraj Singh Biopic
---Advertisement---

Yuvraj Singh Biopic l भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता युवराज सिंगचं आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता दिग्गज खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. हा बायोपिक टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार होणार आहे.

युवराज सिंगने केली या अभिनेत्याची निवड :

माजी खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची निर्मिती भूषण कुमार आणि रवी भागचंदका करणार आहेत. या बायोपिकच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की, क्रिकेटरची भूमिका कोण साकारणार? युवराज सिंगच्या भूमिकेत कोण दिसणार? मात्र या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

मात्र युवराज सिंगच्या बायोपिकसाठी टायगर श्रॉफ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे. अशातच आता युवराज सिंगने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर माझ्या आयुष्यावर बायोपिक बनणार असेल तर त्यामध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने मुख्य भूमिका साकारावी. कारण अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा प्लस पॉइंट म्हणजे त्याचा लूक आणि शरीरयष्टी ही खेळाडू युवराज सिंग सारखीच आहे.

Yuvraj Singh Biopic l कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका :

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘इनसाइड एज’ या क्रिकेटवर आधारित वेब सीरिजमध्ये युवराज सिंगची भूमिका साकारली आहे. मात्र, युवराज सिंगची भूमिका साकारण्याची संधी कोणत्या अभिनेत्याला मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

माजी खेळाडू युवराज सिंगने कॅन्सर या आजाराशी झुंज देत २०११ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला चॅम्पियन बनवले होते. तसेच कॅन्सरसारख्या आजारावर मात करून तो क्रिकेटच्या मैदानात परतला होता.

News Title : Yuvraj Singh Biopic

महत्त्वाच्या बातम्या- 

हुंदाई कंपनी टाटा सफारीला देणार टक्कर; होणार भन्नाट कार लाँच

पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याला ईडीकडून अटक; घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड

फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?

मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करताय? तर ही बातमी वाचाच

“माझी पोलीस सुरक्षा काढून घ्या आणि..”; सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मोठी मागणी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now