पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबरचं धक्कादायक कनेक्शन उघड!

On: May 20, 2025 2:28 PM
Jyoti Malhotra
---Advertisement---

Jyoti Malhotra |  पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरयाणा येथील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तिच्या अटकेनंतर आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सध्या राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), गुप्तचर यंत्रणा (आयबी) आणि मिलिटरी इंटेलिजन्ससह इतर सुरक्षा यंत्रणांकडून ज्योतीची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून तिच्या यूट्युब चॅनलवरील काही व्हिडिओंद्वारे नवीन माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तिचे पहलगाम येथील हल्ल्याशी असलेले कनेक्शन उघड होत आहे.

पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध?

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर, दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात कथितरित्या केक मागवण्यात आला होता. हा केक उच्चायुक्तालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे ज्योती मल्होत्राशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. ज्योती मल्होत्राच्या एका व्लॉगमध्ये ही व्यक्ती तिच्यासोबत दिसली आहे, ज्यामुळे या प्रकरणात मोठे धागेदोरे मिळत आहेत. ही घटना तिच्या पाकिस्तान कनेक्शनवर अधिक प्रकाश टाकते.

ज्योती मल्होत्राला रविवारी रात्री उशिरा पावणे दोनच्या सुमारास तिच्या घरी छापेमारी करून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी तिच्या घरातून कागदपत्रे, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. तपासात असे समोर आले आहे की, तिने लॅपटॉपमधील काही डेटा डिलीट केला असण्याची शक्यता आहे. तो डेटा परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा (आयएसआय) चे अधिकारी ज्योतीच्या संपर्कात होते. या अधिकाऱ्यांना तिने नेमकी कोणती माहिती दिली आणि तिच्याकडून कोणत्या प्रकारची माहिती मागवली जात होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

संशयास्पद भेटी

ज्योतीला पाकिस्तानची प्रतिमा चांगली दाखवण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या होत्या. आता तिचे पाकिस्तान कनेक्शन समोर येत असतानाच, त्याचा थेट संबंध पहलगाम हल्ल्याशी असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवली जात आहे. २३ एप्रिल रोजी, म्हणजेच पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, दिल्लीमधील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर एक कर्मचारी केकचा बॉक्स घेऊन जाताना दिसला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला या सेलिब्रेशनबद्दल विचारले असता, त्याने काहीही उत्तर दिले नव्हते आणि तो बॉक्स घेऊन उच्चायुक्तालयाच्या मुख्य दारात शिरला होता. हीच व्यक्ती ज्योतीच्या एका व्लॉगमध्ये दिसल्यामुळे तिच्या पाकिस्तान कनेक्शनला आणखी बळकटी मिळाली आहे.

पहलगाममधील हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी ज्योती पाकिस्तानला जाऊन आली होती. त्यानंतर तिने पहलगाम, गुलमर्ग, दल लेक आणि पँगोंग लेक या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्ताने भेट दिली होती. पँगोंग लेक परिसर चीनच्या एएसी सीमेजवळ असल्याने तपास यंत्रणांना ज्योतीबद्दल संशय आला आणि तो संशय खरा ठरला. या सर्व घटनांमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ज्योती मल्होत्राचे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे.

Title: YouTuber Jyoti Malhotra’s Connection to Pahalgam Attack, Shocking Video Emerges

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now