‘महिलांना घरात अधिकार देऊ नका, अन्यथा…’; युवराज सिंहच्या वडिलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

On: January 14, 2025 1:02 PM
बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय ‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल! मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण? शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!
---Advertisement---

Yograj Singh | प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहचे वडील योगराज सिंह नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबत ते नहेमीच खळबळजनक वक्तव्य करत असतात. अशात त्यांनी महिलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ‘महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्धवस्त करतील’ असं योगराज सिंह (Yograj Singh) म्हणाले आहेत. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलंय.

युवराज सिंहच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य

युट्यूबर समदीश भाटीयाला युवराजचे वडिल योगराज सिंह यांनी मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी महिलांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्धवस्त करतील. घरचा प्रमुख पुरुष असला पाहिजे, त्याने घर चालतं’, असं योगराज सिंह म्हणाले आहेत.

पुरुष नसेल, तर आईकडे घराची जबाबदारी असली पाहिजे असंही ते पुढे म्हणाले. पुढे त्यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा देखील उल्लेख केला. नवरा असताना महिला घराची प्रमुख झाली, तर काय हरकत आहे?, असा प्रश्न योगराज (Yograj Singh) यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं.

नेमकं काय म्हणाले योगराज सिंह?

“इंदिरा गांधी यांनी हा देश चालवला. त्यांनी देशाची वाट लावली. माफ करा, मी असं बोलतोय. पण तुम्ही कुठल्याही महिलेला घर चालवायला सांगा, ती घराची वाट लावेल. महिलेला अधिकार देऊ नका. त्यांना प्रेम, आदर आणि सन्मान द्या”, असं योगराज म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. योगराज यांचा हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नेटकरी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

योगराज सिंह इतक्यावरच थांबले नाहीत तर पुढे त्यांनी अध्यात्मिक गुरुंचं देखील एक उदाहरण दिलं.“कुठल्याही बाबाकडे महिला भक्तांची संख्या जास्त असते. त्या तिथे काय मागतात? माझा नवरा, माझा मुलगा माझ्या नियंत्रणात राहिला पाहिजे” योगराज यांच्या महिलांविषयीच्या या वक्तव्यावरुन खळबळ उडाली आहे, त्यांच्यावर आता सोशल मीडियावर टीका केली जातेय. आता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच महिला आयोगाने सुद्धा त्यांच्या (Yograj Singh) वक्तव्याची दखल घेतली आहे.

News Title : Yograj Singh controversial Statement about women

महत्वाच्या बातम्या-

बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय

‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन

वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

Join WhatsApp Group

Join Now