शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

On: January 4, 2025 8:04 AM
yogesh kadam claim that sharad pawar may join mahayuti
---Advertisement---

sharad pawar | गेल्या काही दिवसांपासून एकमेकांचे राजकीय विरोधी असलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात सकारात्मक संवाद आणि भेटीगाठी दिसून येत आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष फोडत भाजपशी हातमिळवी केली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत काका-पुतणे एकमेकांविरोधात राजकीय मैदानात उभे होते. लोकसभेला मोठ्या पवारांनी बाजी मारली तर विधानसभेत अजित पवार यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. अजित पवार हे महायुतीत सामील असून ते सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. (sharad pawar)

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब भेट दिली होती. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार दोघेही पुन्हा एकत्र येणार का?, याबाबत चर्चा सुरू झाल्या. या चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरूच आहेत. अशात शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

योगेश कदम यांचं मोठं वक्तव्य

“कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीत सामील होऊ शकतो. याबाबत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झालेल्या आहेत”, असं मोठं भाकीतच योगेश कदम यांनी वर्तवलं आहे. यामुळे चर्चेला उधाण आल्याचं दिसून येतंय. मविआचे अनेक पराभूत उमेदवार हे सध्या महायुतीच्या वाटेवर आहेत. महाविकास आघाडीचा प्रत्येक पराभूत आमदार महायुतीसोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे, असा दावा देखील योगेश कदम यांनी केला.

यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाबाबतही भाष्य केलं. “मी यापूर्वी सांगितलेलं आहे की रत्नागिरीचे पालकमंत्री पद उदय सामंत यांना मिळावं. उदय सामंत हे सीनियर नेते आहेत. ते माझ्यासाठी भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणताच वाद नाही”, असंही योगेश कदम म्हणाले. (sharad pawar)

यावेळी योगेश कदम यांनी ड्रग्जच्या कारवाईवरही महत्वाची माहिती दिली. “शहरांमधून अंमली पदार्थाचा वापर केला जातो. ड्रग्जच्या सेवनांपासून तरुणांना वाचवायचं आहे. ड्रग्जची आंतरराष्ट्रीय तार तिथपर्यंत पोहोचायचं आहे. याबाबत 8 तारखेला पोलीस प्रशासनाचा आढावा घेणार आहोत.”, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. (sharad pawar)

News Title :  yogesh kadam claim that sharad pawar may join mahayuti

महत्वाच्या बातम्या –

आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार

“पुरुषांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स…”, प्रसिद्ध गायिकेचं विधान चर्चेत!

‘ते टॉप सिक्रेट…’; सुरेश धस यांच्या नव्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ

पदभार स्विकारताचं एकनाथ शिंदे अ‍ॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय

अखेर त्याने तोंड उघडलं! वाल्मिक कराडने मागितली तब्बल ‘इतक्या’ कोटींची खंडणी

Join WhatsApp Group

Join Now