रहाणेच्या किट बॅगला लाथ! प्रशिक्षकाशी वाद, यशस्वी जैस्वालने सोडली मुंबई टीम

On: April 4, 2025 3:49 PM
Yashasvi Jaiswal
---Advertisement---

Yashasvi Jaiswal l भारताचा आघाडीचा युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल याने मुंबई क्रिकेट संघ सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटसाठी त्याने मुंबईऐवजी गोवा क्रिकेट संघातून खेळण्याची परवानगी (NOC) मागितली असून, यामागचं कारण आता उघड झालं आहे. यशस्वीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला १ एप्रिल रोजी ईमेलद्वारे अर्ज केला आहे.

या निर्णयामागे प्रशिक्षकांशी झालेला वाद, तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेसोबतचे मतभेद असल्याचं बोललं जात आहे. यामुळे यशस्वी जैस्वाल आणि मुंबई क्रिकेट संघातील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रणजी सामन्यानंतर वाद, जैस्वाल नाराज :

रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल अपयशी ठरला होता, ज्यात त्याने ४ आणि २६ धावा केल्या. या पराभवानंतर प्रशिक्षकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्याचं समोर आलं आहे.

2022 मध्ये देखील यशस्वी जैस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांच्यात मैदानात वाद झाला होता. दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजा आणि जैस्वालमध्ये झालेल्या वादानंतर रहाणेने यशस्वीला मैदानाबाहेर पाठवले होते. त्यानंतर यशस्वीने रागात अजिंक्य रहाणेच्या किट बँगला लाथ मारल्याची माहितीही समोर आली आहे.

Yashasvi Jaiswal l IPLमध्ये दोघं वेगवेगळ्या संघात :

सध्या यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्सकडून, तर अजिंक्य रहाणे कोलकाता नाइट रायडर्सकडून IPL 2025 मध्ये खेळत आहेत. मैदानाबाहेरील हा वाद IPL दरम्यान पुन्हा चर्चेत आला आहे.

यशस्वी जैस्वालची दमदार कारकीर्द :

प्रथम श्रेणी क्रिकेट: 36 सामने, 3712 धावा, 13 शतके, 12 अर्धशतके
लिस्ट-A क्रिकेट: 33 सामने, 1526 धावा, 5 शतके, 7 अर्धशतके

आंतरराष्ट्रीय कारकीर्द (2023 पासून):

कसोटी: 19 सामने, 4 शतके
T20: 23 सामने, 1 शतक
ODI: 1 सामना

यशस्वी जैस्वालच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे त्याच्याकडून देशांतर्गत क्रिकेटमधूनही मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र संघातील अंतर्गत वाद आणि प्रशासनाविषयी असलेल्या नाराजीमुळे त्याने मुंबईचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे.

News Title: Yashasvi Jaiswal Seeks NOC to Leave Mumbai Team After Argument with Coach and Rahane

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now