यशस्वीचा यशस्वी प्रवास; मैदानावर राहून काढलेले दिवस, आता घेतलं ‘इतक्या’ कोटींचं घर

On: February 22, 2024 6:38 PM
Yashasvi Jaiswal Home
---Advertisement---

yashasvi jaiswal home | टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा आहे. देशामध्ये सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया कसोटी मालिकेमध्ये जयस्वालने दोन वेळा द्विशतकी खेळी केली आहे. यामुळे तो चर्चेत आला आहे. मात्र तो आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. यशस्वी जयस्वालने मुंबईमध्ये आपल्या हक्काचा फ्लॅट (yashasvi jaiswal home) घेतला आहे.

5.5 कोटींचं घर

यशस्वी हा सध्या 22 वर्षांचा आहे. आपल्या उभरत्या काळामध्ये त्यानं तब्बल 5.5 कोटींचं घर त्याने विकत घेतलं आहे. मुंबईतील बांद्रामध्ये त्यानं आपलं घर (yashasvi jaiswal home) घेतलं आहे. बांद्रामध्ये अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत. आता या ठिकाणी यशस्वीने देखील आपलं घर घेतलं आहे. लियासेस फोरासने याबाबत माहिती दिली आहे. (yashasvi jaiswal home)

यशस्वीने बांद्रा पूर्व भागामध्ये 1,100 स्क्वेअर फूट घर घेतलं असून त्या फ्लॅटची बुकिंग ही 7 जानेवारी दिवशी केली होती. हा फ्लॅट 48,500 चौसस मीटर फूट आहे. आपल्या कसोटी पदार्पणाआधीच यशस्वीने हे घर विकत घेतलं असल्याची माहिती आहे. तसेच तो घर घेणार असल्याच्या चर्चा आधीपासून होत्या. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

तंबूत काढले दिवस

यशस्वी जयस्वाल आपल्या क्रिकेट करिअरसाठी मायानगरी मुंबईत आला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही होते. राहायला छप्पर नाही. त्यावेळी एकेकाळी यशस्वीने आपल्या कुटुंबासोबत मुंबईच्या आझाद मैदानावरील तंबूत अनेक दिवस काढले आहेत. त्यानंतर यशस्वीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

तो उत्तरप्रदेशमधील बडोही जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. आपल्या करिअरसाठी तो मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत आला. त्याने कमी वयामध्ये अथक परिश्रम केले आहेत. कमी वयामध्ये लगातार दोन वेळा द्विशतक झळकवणारा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.

सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

कसोटी सामन्यात इंग्लंडविरोधामध्ये यशस्वीने दुहेरी शतक केलं. 12 षटकार लगावत त्याने चांगली खेळी केली आहे. तो टीम इंडियातील पहिला आणि जगातील कसोटी सामन्यामध्ये षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

News Title – Yashasvi jaiswal home news Update

महत्त्वाच्या बातम्या

सून ऐश्वर्या रायसाठी अमिताभ बच्चन यांनी उचललं मोठं पाऊल!

अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील नेमकं रहस्य काय?, लेकीचा मोठा खुलासा समोर

SBI च्या ‘या’ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी!

‘या’ राशीच्या लोकांच्या वैवाहिक सुखात होईल वाढ !, पाहा आजचं राशीभविष्य

आंदोलक महिलेचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

 

Join WhatsApp Group

Join Now