क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार WTC 2025 फायनल! ICCकडून तारीख जाहीर

On: September 3, 2024 6:07 PM
WTC 2025
---Advertisement---

WTC 2025 l आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. इंग्लंडच्या लॉर्ड्सवर 11-15 जून रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. गरज भासल्यास 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल आणि लॉर्ड्सवर पहिल्यांदाच विजेतेपदाची लढत होणार आहे.

भारताला दोनदा पराभव पत्करावा लागला :

WTC ची पहिली फायनल 2021 मध्ये साउथॅम्प्टन येथे खेळली गेली होती, तर 2023 च्या विजेतेपदाची लढत ओव्हल मैदानावर झाली होती. आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे 2021 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळा भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

पहिल्यांदा टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. 2025 चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

WTC 2025 l आयसीसीने दिली माहिती :

सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ भरपूर कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ विजेतेपदाची लढत खेळणार याची परिस्थिती निश्चित होईल.

आयसीसीच्या सीईओने या संदर्भात निवेदन जारी केलं आहे, ” या निवेदनात म्हणतील आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा क्रिकेट जगतातील सर्वात कमी कालावधीतील सर्वात रोमांचक स्पर्धा बनली आहे. त्यामुळे या स्पर्धेची तारीख जाहीर करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. “तसेच ही या जगातील कसोटी क्रिकेटच्या वाढत्या आकर्षणाची ओळख देखील आहे, त्यामुळे चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे, म्हणून मी लोकांना विनंती करतो की पुढच्या वर्षीच्या सामन्याची तिकिटे बुक करा.

News Title : WTC 2025 Shedule

महत्त्वाच्या बातम्या-

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे!

पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तीन मेट्रो स्थानकांची नावे बदलणार

… तर यापुढे अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’; नामांतरास ग्रीन सिग्नल

टाटा कंपनीची भन्नाट कार बाजारात लाँच; किंमत असणार फक्त…

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! 11 हजारांहून अधिक जागांवर होणार भरती, असा करा अर्ज

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now