भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली, देशाच्या तिरंग्याखाली खेळण्यासाठी खेळाडूंचा मार्ग मोकळा

On: February 14, 2024 4:59 PM
Wrestling Federation of India
---Advertisement---

Wrestling Federation of India | भारतीय कुस्ती महासंघटनेसाठी एक सुखद बातमी समोर आली आहे. जागतिक कुस्ती महासंघटनेनं (UWW) भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) मागील वर्षी निलंबन केले होते ते निलंबन आता हटवण्यात आले आहे. देशातील पैलवानांना देशाच्या झेंड्याखाली कुस्ती खेळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यामुळे कुस्ती महासंघटनेत आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे अशी परिस्थिती पाहायला मिळते.

भारतीय कुस्ती महासंघटनेनं (Wrestling Federation of India) वेळेत निवडणूक न घेतल्याने त्याच्यावर निलंबन घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जागतिक कुस्ती संघटनेनं 9 फेब्रुवारीला या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यासाठी आणखी एक बैठक घेण्यात आली. सर्व घटक तसेच माहिती लक्षात घेऊन निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक कुस्ती महासंघटनेचं निलंबन उठवताना सांगितलं की, “भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगट, बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक यांच्यावर भारतीय कुस्ती महासंघटना कोणतीही कारवाई करणार नाही. याबाबत भारतीय कुस्ती महासंघाने जर लेखी हामी दिली तर निलंबन मागे घेण्यात येणार आहे. यामुळे देशाच्या तिरंग्याखाली खेळाडूंना खेळता येणार आहे.”

ब्रिजभूषण थोडक्यात प्रकरण

भारतीय कुस्ती महासंघटनेचे तत्कालिन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर काही महिला कुस्तीपटूंनी आणि कुस्ती प्रशिक्षकांनी बलात्काराचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांनी ब्रिजभूषणविरोधात आवाज उठवला. निषेधाच्या काही दिवसानंतर त्यांचे निलंबन करण्यात आलं. यावेळी विनेश फोगट, बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक यांनी काही खेळाडूंच्या साथीने ब्रिजभूषणच्या कृत्याचा निषेध केला. त्यामुळे काही दिवसांनी त्यांचे निलंबन करण्यात आले.

भ्रष्टाचाराचा आरोप

ब्रिजभूषणने महिलांवर अन्याय केल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. हा सर्व प्रकार जागतिक कुस्ती महासंघटना पाहत होती. आणि त्यांनी आपला निर्णय जाहीर करत भारतीय कुस्ती महासंघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ब्रिजभूषणला निलंबित करण्यात आलं. त्यानंतर ब्रिजभूषनचे निकटवर्तीय संजय सिंह यांना भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष झाले.

ब्रिजभूषणच्या निलंबनानंतर संजय सिंह यांना कुस्ती महासंघटनेचं अध्यक्ष करण्यात आलं. मात्र याविरोधात साक्षी मलिकने राजीनामा दिला. तसेच त्यापाठोपाठ बजरंग पूनियानं देखील पद्मश्री पुरस्कार सराकारला परत करण्याचा निर्णय घेतला. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पूनियानं ब्रिजभूषणविरोधात आंदोलन केलं.

News Title – Wrestling federation Of india news update

महत्त्वाच्या बातम्या

“माझ्या जीवाला धोका..”,जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपाने खळबळ

‘वेलेंटाईन वीक’ मध्ये ‘या’ वस्तूंच्या खरेदीत वाढ!

झटपट वजन कमी करायचंय?, मग ‘हा’ डाएट प्लॅन तुमच्यासाठीच

“…म्हणून लोक तुमच्यावर थुंकत आहेत”, अशोक चव्हाणांवर संजय राऊत भडकले

भारतीय क्रिकेटवर शोककळा ! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचं निधन

 

 

Join WhatsApp Group

Join Now